लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : केंद्रीय पद्धतीने होणाऱ्या इयत्ता अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशासाठी आतापर्यंत २८ हजार ९८२ विद्यार्थ्यांनी भाग १ व भाग २ संपूर्ण भरून आॅनलाइन पद्धतीने जमा केले आहेत. भाग १ व भाग २ भरण्यासाठी २७ जून रोजी दुपारी ४ वाजेपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशाच्या आॅनलाइन अर्जाचा पहिला भाग २५ मे पासून भरण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारअखेरपर्यंत ७५ हजार १३ विद्यार्थ्यांनी अकरावीच्या अर्जाचा पहिला भाग भरला आहे, तर २८ हजार ९८२ विद्यार्थ्यांनी भाग २ भरला आहे. महाविद्यालयांसाठी उपलब्ध असलेल्या २० टक्के कोट्यासाठी महाविद्यालयांकडे २७ जूनपर्यंत अर्ज करावे लागणार आहेत. २८ जून रोजी महाविद्यालये कोटा प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर करतील. २८ व २९ जून रोजी कोटा प्रवेशप्रक्रिया पूर्ण करायची आहे. २९ जून रोजी विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती तपासणीसाठी आॅनलाइन प्रसिद्ध केली जाईल. काही त्रुटी राहिल्या असल्यास ३० जून रोजी लेखी हरकती नोंदविता येणार आहेत. कोटा प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी ३० जून रोजी प्रसिद्ध होईल.
अकरावी प्रवेशासाठी २९ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज
By admin | Updated: June 20, 2017 06:50 IST