शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शतकोत्तर रौप्यमहोत्सवी मिरवणूक लांबणार, नियम व सूचनांचे पालन करण्याचे पोलिसांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 01:47 IST

गणेशोत्सवाचे यंदाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे या वेळची विसर्जन मिरवणूक लांबण्याची चिन्हे आहेत. गेल्या वीस वर्षांत सर्वाधिक लांबलेली मिरवणूक २00५ मधील होती.

पुणे : गणेशोत्सवाचे यंदाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे या वेळची विसर्जन मिरवणूक लांबण्याची चिन्हे आहेत. गेल्या वीस वर्षांत सर्वाधिक लांबलेली मिरवणूक २00५ मधील होती. तब्बल ३४ तास ही मिरवणूक चालली होती. गेल्या वर्षी २८ तास ३0 मिनिटे चाललेली मिरवणूक यावर्षी किती वेळ लावते हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. दरम्यान, पोलिसांनी मात्र, मंडळांना नियमांचे आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.पुण्याचा गणेशोत्सव कायमच आकर्षक आणि ऐतिहासिक राहिलेला आहे. पुण्यामधूनच या उत्सवाला सुरुवात झाल्याने त्याचे वेगळे महत्त्व आहे. गणेशोत्सवापेक्षाही शहरातील विसर्जन मिरवणुका कायमच चर्चेत राहिलेल्या आहेत. विसर्जन मिरवणुकांमधील देखावे, विद्युत रोषणाई, मिरवणुकांचा राजेशाही थाट ही वैशिष्ट्ये असतात. मात्र, पोलीस आणि मंडळांच्या वादामुळे विसर्जन मिरवणुका चर्चेत असतात. अनेकदा मंडळांनी पोलिसांच्या कारवाईमुळे त्यांना सहकार्य न करण्याचेही निर्णय यापूर्वी घेतले आहेत. राजकीय पुढाºयांना मध्यस्ती करून हा तिढा अनेकदा सोडवावा लागला आहे.मात्र, यावर्षी पोलिसांनी मंडळांशी संवादाची भूमिकाठेवल्याने अद्याप तरी कोणताही वाद उद्भवलेला नाही. कायदा सुव्यवस्था आणि सुरक्षा या दोन्ही बाबी लक्षात घेऊन पोलिसांनीही चोख नियोजन केले आहे. पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मानाच्या पाचही गणपतींनी दोन ते तीनच पथके मिरवणुकीमध्ये सहभागी करुन घेण्याचा निर्णय घेतला आहे. विविध पोलीस ठाण्यांच्या स्तरावर डॉल्बीमुक्त मिरवणुकीचे आवाहन करण्यात आले आहे. त्यालाही बºया प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. परंतु, शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. मंडळांनी जय्यत तयारी केलेली आहे. त्यामुळे तूर्तास तरी यंदाच्या मिरवणुकीला किती वेळ लागतो याबाबत उत्सुकता आहे.गेल्या वीस वर्षांत निघालेल्या मिरवणुकांमध्ये सर्वाधिक वेळ २00५ मधील मिरवणुकीला लागला होता. त्या खालोखाल २00१मध्ये मिरवणुकीला ३२ तास लागले होते. २00७मध्ये ३0 तास २0 मिनिटे मिरवणूक चालली होती. तर सर्वात कमी वेळ चाललेली मिरवणूक २00९ मध्ये निघाली होती. ही मिरवणूक २५ तास १५ मिनिटे चालली होती.वर्ष             वेळ1997      26 तास1998      30 तास1999      28 तास2000     30 तास2001      32 तास 15 मिनिटे2002     30 तास 15 मिनिटे2003     28 तास 05 मिनिटे2004     25 तास 30 मिनिटे2005     34 तास2006     29 तास 25 मिनिटे2007     30 तास 20 मिनिटे2008     28 तास 15 मिनिटे2009     25 तास 15 मिनिटे2010     27 तास 14 मिनिटे2011      27 तास 47 मिनिटे2012     28 तास 50 मिनिटे2013     27 तास 25 मिनिटे2014     29 तास 12 मिनिटे2015     28 तास 55 मिनिटे2016     28 तास 30 मिनिटे

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनPuneपुणे