शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

बायफोकलची प्रवेश यादी जाहीर, वेळेत प्रवेश घेण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 01:51 IST

पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून, गुरूवारी द्विलक्षी अभ्यासक्रमाची पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली.

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून, गुरूवारी द्विलक्षी अभ्यासक्रमाची पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. पहिल्या यादीतून २ हजार ४०८ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत. त्यातही पहिला पसंतीक्रम मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १ हजार १०२ आहे.बायफोकलच्या एकूण ८ हजार ४९५ जागा असून, पहिल्या गुणवत्ता यादीसाठी ४ हजार ८७८ पात्र ठरले आहेत. इयत्ता अकरावी आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेनुसारच विज्ञान, वाणिज्य या शाखेत द्विलक्षी अभ्यासक्रमाचे प्रवेश दिले जाणार आहेत. पहिल्या पसंतीक्रमानुसार प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी २२ जून रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जावून आपला आॅनलाइन प्रवेश निश्चित करणे बंधनकारक आहे. प्रवेश न घेणारे विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी पात्र राहणार नाहीत. त्याचप्रमाणे पसंतीक्रम २ ते १० अ‍ॅलॉट झालेल्या विद्यार्थ्यांना सध्याचा प्रवेश मान्य असेल, तर त्यांनी दिलेल्या वेळेत आॅनलाइन प्रवेश घेणे आवश्यक आहे. मात्र, हे विद्यार्थी दुसऱ्या गुणवत्ता यादीसाठी पात्र असतील. एकदा प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द करू नये. प्रवेशाच्या वेळी सर्व कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेला नसेल त्यांनी बायफोकलच्या दुसºया फेरीची वाट पाहावी. वेळापत्रकानुसार पसंतीक्रम बदलावे, असे शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे स्पष्ट केले.