पुरंदर तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येचा आलेख मागील महिण्यात उतरता होता. दि. १ डिसेंबर पर्यंत तालुक्यात ३,९३८ रुग्णसंख्या होती. त्यातामध्ये ३७० रुग्ण वाढून दि.२ जानेवारील ४,२९८ झाले. त्यामध्ये ३६७ रुग्ण वाढून २ फेब्रुवारीला ४,६६५ झाले. तर त्यानंतर रुग्णंचा आलेख खाली येऊन ११९ रुग्ण फक्त वाढले होते. १ मार्चला ४,८६५ रुग्णसंख्या झाली मात्र गेल्या पंधरा दिवसांत ३१३ रुग्ण वाढून १५ मार्च रोजी ५,१६९ रुग्णसंख्या झाली आहे.
या पैकी ४,८१६ रुग्णांवर उपचाराअंती घरी सोडले असून, १२९ म्रुत्यु झाले आहेत, तर आज रोजी १५ मार्च पर्यंत २२४ रुग्ण उपचार घेत आहेत. पण मार्च महिण्याच्या पहिल्या १५ दिवसांत तब्बल ३१३ रुग्णांचे अहवाल पाँझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पुरंदर मध्ये चिंता वाढली आहे.
पुरंदर तालुक्यातील ९८ गावांपैकी आज रोजी ५१ गावे कोरोन मुक्त आहेत. या ५१ गावातएकही कोरोन रुग्ण एक्टीव्ह नाही. सोमवारी जेजूरी ग्रामीण रुग्णालयातील कोरोना चाचणी झाली नाही. अधिक चौकशी केली असता पुढील काही दिवस जेजूरी येथे कोरोना चाचणी होणार नसल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे सासवडच्या तपासणी केंद्रावर ताण येण्याची शक्यता आहे. तर तालुक्यातील ग्रामीण भागातून ३० ते ३५ किलोमीटरवरून कोरोना तपासणी करण्यासाठी लोकांना सासवडला यावे लागणार आहे.
पुरंदर तालुक्यातील १५ मार्च रोजी पर्यंत कुठल्या गावात किती रुग्ण झाले, किती मुक्त झाले, म्रुत्यु व उपचार घेत आहेत हे खालील प्रमाणे:सासवड एकुण रुग्णसंख्या १,६५३, उपचाराअंती कोरोना मुक्त १,५३७, म्रुत्यू ४०, तर उपचार घेत आहेत ७६. जेजूरी एकुण रुग्णसंख्या ५०४, उपचाराअंती कोरोना मुक्त ४७४, म्रुत्यू १४, तर उपचार घेत आहेत १६. नीरा एकुण रुग्णसंख्या ४०३, उपचाराअंती कोरोना मुक्त ३८२, म्रुत्यू १३, तर उपचार घेत आहेत ८, (तर खाजगी ६ रुग्ण आहेत). कोळविहिरे एकुण रुग्णसंख्या ७०, उपचाराअंती कोरोना मुक्त ५९, म्रुत्यू १, तर उपचार घेत आहेत. १०. पिंपरे (खुर्द) एकुण रुग्णसंख्या ९१, उपचाराअंती कोरोना मुक्त ७८, म्रुत्यू १, तर उपचार घेत आहेत १२. गुळुंचे एकुण रुग्णसंख्या ७०, उपचाराअंती कोरोना मुक्त ५८, म्रुत्यू ३, तर उपचार घेत आहेत ९. नावळी एकुण रुग्णसंख्या २१, उपचाराअंती कोरोना मुक्त १४, म्रुत्यू ०, तर उपचार घेत आहेत ०७. वाल्हे एकुण रुग्णसंख्या १५५, उपचाराअंती कोरोना मुक्त १४८, म्रुत्यू १, तर उपचार घेत आहेत ०६. साकुर्डे एकुण रुग्णसंख्या ५०, उपचाराअंती कोरोना मुक्त ४३, म्रुत्यू २, तर उपचार घेत आहेत ०५. अंबोडी एकुण रुग्णसंख्या ४६, उपचाराअंती कोरोना मुक्त ४०, म्रुत्यू १, तर उपचार घेत आहेत ०५.