शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पेपरफुटीच्या चौकशीसाठी आणखी एक पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 01:50 IST

बारावी इंग्रजीचा पेपर परीक्षा सुरू असतानाच व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हायरल झाल्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी आणखी एक त्रिसदस्यीय पथक बार्शीच्या तांबेवाडीला पाठविले जाणार आहे

पुणे : बारावी इंग्रजीचा पेपर परीक्षा सुरू असतानाच व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हायरल झाल्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी आणखी एक त्रिसदस्यीय पथक बार्शीच्या तांबेवाडीला पाठविले जाणार आहे. त्यांच्याकडून पुन्हा एकदा झालेल्या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी दिली आहे.बारावी इंग्रजीचा पेपर सुरू होताच तासाभरातच सोलापूर जिल्ह्यातील बार्शीच्या वसंत महाविद्यालयातून (तांबेवाडी) प्रश्नपत्रिका व्हायरल झाली. याप्रकरणाची चौकशी करून, त्याचा प्राथमिक अहवाल बुधवारी गटशिक्षणाधिकाºयांनी विभागीय मंडळाला तातडीने पाठवून दिला होता. त्यानंतर आता राज्य मंडळाचे पथक त्या ठिकाणी भेट देऊन चौकशी करणार आहे.भरारी पथकांची निष्क्रियताराज्य मंडळाने बारावीच्या परीक्षेत कॉपीसारखे होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी मंडळाकडून प्रत्येक जिल्ह्यासाठी ७ याप्रमाणे २५२ भरारी पथके नेमली आहेत. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. विभागीय पातळीवरील विशेष भरारी पथक, महिला पथक कार्यरत आहे. इंग्रजी, गणित या विषयांच्या परीक्षेच्या दिवशी बैठी पथके संवेदनशील केंद्रांवर तैनात ठेवण्याचा निर्णय घेतला गेला; मात्र ही ग्रामीण भागांमध्ये परीक्षेदरम्यान मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत.बार्शीच्या तांबेवाडीमध्ये झेरॉक्स दुकानातून सर्रास कॉपी पुरविल्या जात असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. व्हॉट्सअ‍ॅपवरून प्रश्नपत्रिका व्हायरल करून त्याची उत्तरे पुरविली जात होती. राज्य मंडळाकडून इतकी भरारी, विशेष, महिला व बैठी पथके कार्यरत असताना गैरप्रकार घडत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. भरारी पथकांकडून योग्य प्रकारे जबाबदारी पार पाडली जात नसल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. इंग्रजीच्या पहिल्या पेपरला संपूर्ण राज्यात केवळ ६२ कॉपीचे गैरप्रकार नोंदविण्यात आले. राज्यभर मोठ्याप्रमाणात गैरप्रकार होत असतानाही भरारी पथकांकडून योग्य प्रकारे जबाबदारी पार पाडली जात नसल्याने खूप कमी गैरप्रकार उजेडात येऊ शकत आहे.सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, तहसीलदार यांनीही बारावीच्या परीक्षा केंद्रांना भेटी द्याव्यात, कॉपीचे गैरप्रकार घडू नयेत यासाठी मदत करावी, अशी विनंती राज्य मंडळाकडून दर वर्षी करण्यात येते; मात्र बहुतांश अधिकाºयांकडून याकडे लक्ष दिले जात नाही. परीक्षा केंद्राच्या परिसराचे व्हिडीओ चित्रीकरण करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत; मात्र त्याचीही अंमलबजावणी अनेक परीक्षा केंद्रांनी केलेली नाही.