शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
12
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
14
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
15
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
16
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
17
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
18
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
19
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
20
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू

आणखी एक चिटफंड घोटाळा उघड

By admin | Updated: June 23, 2016 02:06 IST

गुंतवणूक करा, व्याजासह मोठ्या रकमेचा फायदा मिळवा, असे आमिष दाखवून दिल्लीस्थित एका चिटफंड कंपनीने पिंपरी-चिंचवड शहर परिसर ते पुण्याच्या विविध भागांतील अनेक

पिंपरी : गुंतवणूक करा, व्याजासह मोठ्या रकमेचा फायदा मिळवा, असे आमिष दाखवून दिल्लीस्थित एका चिटफंड कंपनीने पिंपरी-चिंचवड शहर परिसर ते पुण्याच्या विविध भागांतील अनेक नागरिकांची फसवणूक केली आहे. मोरवाडीत आलिशान कार्यालय थाटून गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये उकळून चिटफंडच्या संचालकांनी पोबारा केला आहे. जिल्ह्यात सुमारे दोन हजार एजंटांचे जाळे निर्माण करून हे नेटवर्क सुरू होते. अचानक कार्यालय बंद पडल्याने गुंतवणूकदार चिंताग्रस्त झाले आहेत. मुदत संपल्यानंतरही मुद्दल आणि अन्य रक्कम न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आले. कार्यालय बंद झाले. संचालकांचा संपर्क तुटला. कार्यालयातील कोणाशीही संपर्क होत नसल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. फसवणूक झाल्यानंतर काही गुंतवणूकदारांनी सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे यांची भेट घेतली. त्यांच्याकडे फसवणूक झाल्याची कैफियत मांडली. फसवणुकीचे बळी ठरलेल्या गुंतवणूकदारांच्या वतीने शिंदे यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार दिली आहे. संबंधित संस्थेचे प्रमुख कार्यालय दिल्ली येथे असून, तेथे जाऊन पुण्यातील एकाने फिर्याद दाखल केली आहे. पिंपरी पोलिसांकडे चिटफंड संस्थेच्या संचालकांविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अवधूत चिटफंडच्या संचालकाविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. नागरिकांना कोट्यवधींचा गंडा घालून पोबारा करण्याचे प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये सर्रासपणे घडत आहेत. (प्रतिनिधी)