शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

आणखी १६५ बस दाखल

By admin | Updated: December 27, 2014 05:05 IST

पीएमपीच्या बंद पडणाऱ्या बसची वाढती संख्या लक्षात घेऊन पीएमपीच्या संचालक मंडळाने नवीन १६५ बसखरेदीस शुक्रवारी मान्यता दिली आहे

पुणे : पीएमपीच्या बंद पडणाऱ्या बसची वाढती संख्या लक्षात घेऊन पीएमपीच्या संचालक मंडळाने नवीन १६५ बसखरेदीस शुक्रवारी मान्यता दिली आहे. दुरुस्तीअभावी ६०० बस बंद असताना नवीन १६५ बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.संचालक मंडळाच्या बैठकीस पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीकर परदेशी, महापौर दत्तात्रय धनकवडे, स्थायी समितीचे अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी, पिंपरी-चिंचवड स्थायी समितीचे अध्यक्ष महेश लांडगे, संचालक प्रशांत जगताप उपस्थित होते. पीएमपीकडे सध्या १३०० बस आहेत. त्यामध्ये आता १६५ बसची भर पडणार आहे. पीएमपीच्या अनेक बस रस्त्यावरच बंद पडत असल्याने विविध मार्गावरून धावणाऱ्या बसचे वेळापत्रक कोलमडते. प्रवाशांची संख्या आणि रस्त्यावर धावणाऱ्या बसची संख्या यांचे प्रमाण व्यस्त असल्याने पीएमपीची प्रवासीसंख्या वेगाने घटत आहे. पीएमपीऐवजी खासगी वाहनांचा आधार प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात घेतला जाऊ लागला आहे. बस बंद असल्याने अनेक बसचालक व कंडक्टर यांना काम उपलब्ध नाही. काम मिळावे म्हणून काही दिवसांपूर्वीच कामगार संघटनांकडून आंदोलन छेडण्यात आले होते. नवीन बस खरेदी करण्याचा निर्णय संचालक मंडळाकडून घेण्यात आला आहे. बे्रक फेल, ब्रेक डाऊन, रस्त्यांमध्ये गाडी बंद पडणे आदी प्रकारांमुळेही प्रवाशांकडून पीएमपीकडे पाठ फिरवली जात आहे. (प्रतिनिधी)