शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

टंकलेखन परीक्षेचा निकाल जाहीर; एकूण २४ हजार ५०० विद्यार्थी उत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 16:57 IST

संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षेचा आॅनलाइन निकाल आज जाहीर झाला आहे. मराठी, हिंदी व इंग्रजीची प्रति मिनिट ३० व ४० शब्द टंकलेखन परीक्षेचा एकूण निकाल अनुक्रमे ४१.६५ टक्के ४६ टक्के लागला आहे.

ठळक मुद्दे निकाल विद्यार्थ्यांना परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.मूळ गुणपत्रके सर्व जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत संगणक टंकलेखन संस्थांना वितरित करण्यात येणार आहेत.

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आॅगस्ट २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षेचा आॅनलाइन निकाल आज जाहीर झाला आहे. मराठी, हिंदी व इंग्रजीची प्रति मिनिट ३० व ४० शब्द टंकलेखन परीक्षेचा एकूण निकाल अनुक्रमे ४१.६५ टक्के ४६ टक्के लागला आहे. दोन्ही परीक्षांमध्ये एकूण २४ हजार ५०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. निकाल www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रकाची आॅनलाईन प्रिंट घेता येईल. इंग्रजी विषयाची परीक्षा दि. १८ ते २३ आॅगस्टदरम्यान तर मराठी व हिंदी टंकलेखन परीक्षा २८ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत घेण्यात आली होती. मराठी व हिंदी ३० व ४० प्रतिशब्द मिनिट परीक्षेचा निकाल अनुक्रमे ३३.७८ व ४१.६९ टक्के, तर इंग्रजी परीक्षेचा निकाल ४६.३८ व ४६.६५ टक्के इतका लागला आहे. प्रति मिनिट ३० शब्द टंकलेखन परीक्षा एकूण ५० हजार ६४ विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यापैकी २० हजार ८५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर ५९ जणांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. तर ४० शब्द प्रतिमिनिट परीक्षेला बसलेल्या एकूण ७ हजार ८९७ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ६३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांची मूळ गुणपत्रके सर्व जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत संगणक टंकलेखन संस्थांना वितरित करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना त्याची गुणपत्रके व प्रमाणपत्र संस्थांमधून कार्यालयीन वेळेत मिळतील. गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी निकाल जाहीर झालेल्या तारखेपासून १० दिवसांत विद्यार्थ्यांना संस्थेतून अर्ज करता येईल. गुणपडताळणीसाठी प्रति विषय १०० रुपये व उत्तरपत्रिका छायाप्रती मिळण्यासाठी प्रति विषय ४०० रुपये आॅनलाईन पद्धतीने २५ आॅक्टोबरपर्यंत भरावे लागेल, अशी माहिती परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांनी दिली.