शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शहरावर ऐन सणासुदीत कचरा संकट

By admin | Updated: October 8, 2014 05:22 IST

गेल्या महिनाभराचे वीजबिल थकल्याने शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाची वीज पुन्हा ‘महावितरण’ने तोडली आहे.

पुणे : गेल्या महिनाभराचे वीजबिल थकल्याने शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाची वीज पुन्हा ‘महावितरण’ने तोडली आहे. सुमारे आठ लाख रुपयांची थकबाकी असल्याने हा प्रकल्प गेल्या तीन दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे शहरात विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शहरात पुन्हा पाऊस सुरू झाला असल्याने साचलेला कचरा भिजला असल्याने, या कचऱ्यावर इतर प्रकल्पांतही प्रक्रिया करण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये शहरावर पुन्हा एकदा कचरासंकट ओढावले आहे.शहरात दररोज निर्माण होणाऱ्या सुमारे १६०० टन कचऱ्यावर पालिकेकडून हंजर, दिशा, रोकेम; तसेच अजिंक्य या प्रकल्पांमध्ये प्रक्रिया केली जाते. तर, उर्वरित कचरा उरुळी येथील कचरा डेपोमध्ये कँपिंग केला जातो. त्यात सर्वाधिक ३०० ते ३५० टन मिश्र कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या प्रकल्पाचे वीजबिल थकबाकी असल्याने प्रकल्प व्यवस्थापनाकडून ती भरण्यास असर्मथता दर्शविण्यात आल्याने ‘महावितरण’कडून वीज तोडली जात आहे. या पूर्वी दोन वेळा ‘महावितरण’ने या प्रकल्पाची वीजजोड तोडला असताना, पालिकेने ही थकबाकी भरली आहे. दरम्यान, मागील महिन्याचे सुमारे ८ लाखांचे बिल थकल्याने तीन दिवसांपूर्वी या प्रकल्पाची वीज तोडण्यात आली होती. त्यातच महापालिकेस सलग पाच दिवसांची सुटी असल्याने हे बिल प्रशासनाने भरलेले नाही. त्यामुळे हा प्रकल्प आज दिवसभरही अंधारतच असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे या प्रकल्पात प्रक्रिया न होणारा कचरा शहरात; तसेच पालिकेच्या कचरा रॅम्पवर साठवून ठेवण्यात आलेला आहे.(प्रतिनिधी)