शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

संगणकामुळे बदलेल दिव्यांगांचे आयुष्य

By admin | Updated: April 19, 2016 00:49 IST

गेल्या काही वर्षांमध्ये संगणकात नानाविध प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग विशेष मुलांसाठीही होत आहे. संगणकाचे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून दिव्यांग

पुणे : गेल्या काही वर्षांमध्ये संगणकात नानाविध प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग विशेष मुलांसाठीही होत आहे. संगणकाचे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून दिव्यांग मुलांच्या कारकिर्दीला प्रोत्साहन मिळत आहे. दिव्यांगांची प्रतिभा आपल्याला शोधून काढायची आहे. त्यांच्यातील विशेष नैपुण्य मिळवून त्याचा संगणकाशी संबंध जोडला जाऊ शकतो का, याबाबत संशोधनाची गरज आहे. भविष्यात संगणकामुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळेल, असा विश्वास ज्येष्ठ संगणकशास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केला.संगणकतज्ज्ञ आणि रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे माजी प्रांतपाल डॉ. दीपक शिकारपूर यांनी लिहिलेल्या उत्कर्ष प्रकाशननिर्मित ‘दिव्यांग संगणक’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते सोमवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते. आपटे प्रशालेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमास संजय गांधी, दिलीप देशपांडे, गौरी शिकारपूर, सु. वा. जोशी, अभय आपटे उपस्थित होते. डॉ. भटकर म्हणाले, ‘‘गेल्या काही वर्षांत संगणकाने क्रांतीचा उच्चांक गाठला आहे. सुपर कॉम्प्युटरमध्ये क्रांती होत असताना ती मर्यादित लोकांपर्यंतच सीमित राहील का, असा प्रश्न मनात निर्माण झाला होता. मात्र, संशोधनामुळे ही भीती राहिलेली नाही. विशेष मुलांना उभारी देण्यासाठी विविध प्रकारच्या उपक्रमांची गरज आहे.’’संजय गांधी म्हणाले, ‘‘सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून दिव्यांगांना कारकिर्दीच्या विविध वाटा चोखाळण्याची संधी दिली जात आहे. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत त्यांना स्मार्टफोन रिपेअरिंग, कॉम्प्युटर हार्डवेअर अशा अभ्यासक्रमांच्या माध्यमातून करिअरला प्रोत्साहन मिळू शकते. निश्चय, निरंतर प्रयत्न, निर्णयक्षमता आणि निराशेवर मात या माध्यमातून दिव्यांग मुलांच्या आयुष्याला कलाटणी मिळू शकते.’’अभय आपटे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. भारती डोळे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)