शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाड्या होणार ‘हायटेक’; महिला व बालकल्याण विभागाकडून १ कोटी ७० लाख रुपयांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 11:54 IST

पुणे जिल्ह्यातील अंगणवाड्यांचे आता रूप पालटणार आहे. महिला व बालकल्याण विभागाकडून १ कोटी ७० लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

ठळक मुद्दे१ कोटी ७० लाख रुपयांचा निधी अंगणवाडी केंद्रांना सुविधा पुरविण्यासाठीफॅन, धान्यकोठी, वॉटर फिल्टर, लॅपटॉप, दृकश्राव्य, शैक्षणिक साहित्य पुरविण्यासाठी निधी मंजूर

पुणे : महिला व बालकल्याण विभागाकडून १ कोटी ७० लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे या निधीमधून जिल्ह्यातील अंगणवाड्यांचे आता रूप पालटणार आहे. या निधीतून अंगणवाड्यांना सर्व सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाने सांगितले.सद्य:स्थितीत जिल्ह्यातील अनेक अंगणवाड्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे़  त्यामध्ये पुरेशा सुविधाही उपलब्ध नसल्याचे चित्र आहे़  जिल्ह्यात खासगी शाळांचे मोठ्या प्रमाणात पेव फुटले असल्यामुळे पालकांचा मुलांना खासगी शाळेत घालण्याकडे ओढा आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाला मिळालेल्या निधीपैकी १ कोटी ७० लाख रुपयांचा निधी अंगणवाडी केंद्रांना सुविधा पुरविण्यासाठी दिला आहे़ या निधीतून अंगणवाडी केंद्रांना फॅन, धान्यकोठी, वॉटर फिल्टर, लॅपटॉप, दृकश्राव्य, शैक्षणिक साहित्य व इतर साहित्य पुरविण्यासाठी हा निधी मंजूर केला आहे़  यामुळे जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांना गरजेनुसार साहित्याचा पुरवठा केला जाणार आहे़ त्यामुळे अंगणवाड्यांचा दर्जा सुधारण्यास मदत होणार असून, चांगल्या दर्जाचे पूर्व प्राथमिक शिक्षण चिमुरड्यांना मिळणार आहे़गेल्या दोन वर्षांपूर्वी तत्कालीन महिला व बालकल्याण समितीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील बहुतांश अंगणवाड्यांमध्ये लोकवर्गणीतून विविध उपक्रम राबविले. तसेच, विविध वस्तूही खरेदी करण्याची संकल्पना प्रत्यक्षात आणली. त्यामुळे अनेक अंगणवाड्यांचा दर्जा सुधारला आहे़ आता मात्र जिल्हा परिषदेच्या निधीतून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याने खºया अर्थाने अंगणवाड्या ‘हायटेक’ होणार आहेत़

 

अंगणवाडीमध्ये अन्नधान्याची स्वच्छता राहावी़  विद्यार्थ्यांना चांगले पाणी प्यायला मिळावे; तसेच लॅपटॉपमुळे आॅनलाइन रेकॉर्ड ठेवण्यासाठी मदत होणार आहे. यामुळे अंगणवाडी सेविकांचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे़      - दीपक चाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. 

टॅग्स :zpजिल्हा परिषद