शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

"आंदोलनजीवी ही पंतप्रधानांनी संसदेतून आंदोलनाला दिलेली शिवी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 22:08 IST

Farmer Protest: डॉ. गणेश देवी: राष्ट्र सेवा दल शेती कायद्याविरोधात १० लाख सह्या जमा करणार

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे: आंदोलनजीवी ही देशाच्या पंतप्रधानाने देशाच्या सर्वोच्च सभाग्रृहातून या देशातील प्रत्येक आंदोलकाला दिलेली शिवीच आहे अशी टीका राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी केली.

या देशाला स्वातंत्र्य आंदोलनातून मिळाले, संयुक्त महाराष्ट्र आंद़ोलनातूनच झाला. या अशा शेकडो आंदोलनातील शहिदांचा हा अपमान आहे असे देवी म्हणाले. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाता पाठिंबा देण्यासाठी राष्ट्र सेवा दल.काय करणार याची माहिती देण्यासाठी देवी बुधवारी पुण्यात आले होते.आंदोलनजीवी म्हणणे अयोग्य आणि अपमानजनक आहे असे ठाम मत व्यक्त करत देवी म्हणाले, या सरकारने विरोधी विचार अस्तित्वात ठेवायचाच नाही या दिशेनेच वाटचाल सुरू केली असल्याचे दिसते आहे. पंतप्रधान ज्या सभागृहात राहून बोलले ते सभागृहही आंदोलनातूनच निर्माण झाले आहे हे ते विसरले. भारताला आंदोलनाचाही इतिहास आहे. असंख्य लोक अशा आंदोलनात सहभागी असतात. दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदोलनही याला अपवाद नाही. केंद्र सरकार हे एका राज्यातील शेतकर्यांचे आंदोलन आहे अशी कितीही टीका करो, पण खरे तर ते आता देशाचेही राहिलेली नाही, आंतरराष्ट्रीय होत चालले आहे. मात्र ते मोडीत काढण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, व त्यातूनच सर्वोच्च पदावरील व्यक्तीने अशी अवमानजनक भाषा वापरली आहे. 

सेवा दलाच्या वतीने कर्नाटक व महाराष्ट्रातून शेती कायद्याच्या विरोधात १० लाख सह्या जमा केल्या जातील. सेवा दल सैनिक, समविचारी संघटना यांचे सदस्य या सह्या गावांगावांमधून जमा करतील. त्या सर्व दोन्ही राज्यांच्या राज्यपालांना व राष्ट्रपतीनांही देण्यात येतील. याशिवाय अन्य काही ऊपक्रमही सेवा दल.करत आहे अशी माहिती देवी यांनी दिली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmers Protestशेतकरी आंदोलन