शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र एटीएसच्या शौर्याचा आंध्र प्रदेश सरकारकडून गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 04:53 IST

माओवादी चळवळीचा शहरी भागात प्रचार करणाऱ्या मुख्य सूत्रधारासह त्याच्या ८ साथीदारांना अटक करणा-या महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या शौर्याचा आंध्र प्रदेश सरकारने नुकताच गौरव केला

पुणे : माओवादी चळवळीचा शहरी भागात प्रचार करणाऱ्या मुख्य सूत्रधारासह त्याच्या ८ साथीदारांना अटक करणा-या महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या शौर्याचा आंध्र प्रदेश सरकारने नुकताच गौरव केला आहे़ ही कामगिरी तत्कालीन एटीएस प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने केली होती.मुख्य आरोपी कृष्णा लिंगय्या उर्फ अजय उर्फ महेश लिंगप्पा घोषका उर्फ हरीष उर्फ सी अनिल लिंगप्पा उर्फ वेणुगोपालम उर्फ वेणु वेलगोटा याच्यावर आंध्र प्रदेश सरकारने २०१२ मध्ये तब्बल ८ लाखाची बक्षीस जाहीर केले होते़ त्याच्या बरोबरच इतर ७ आरोपींना एटीएसने मुंबईच्या विविध भागातून २०१८ मध्ये अटक केली. अटक केलेले सर्व आरोपी कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया (माओवादी) या दहशतवादी संघटनेशी संबंधित असून, बेकायदेशीर कृत्य करून देशाची सुरक्षा व सार्वभौमत्वास धोका उत्पन्न करत असल्याचे तपासाअंती निदर्शनास आल्यामुुळे त्यांच्याविरुद्ध दहशतवाद विरोधी पथक पोलीस ठाणे मुंबई या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.आरोपींनी २००७ पासून गुजरातचा काही भाग, नाशिक , औरंगाबाद, मुंबई, पुणे या शहरी भागामध्ये नक्षलवादी चळवळीची विचारसरणी राबविण्याचे काम सुरु केले. मुख्य सूत्रधार कृष्णा लिंगय्या हा वेगवेगळी नावे धारण करून दहा वषार्पांसून भूमिगत राहून गुंगारा देत होता. त्याच्यावर गुजरात व आंध्र प्रदेशात गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे आंध्र प्रदेश सरकारने त्यांच्यावर नक्षल चळवळीतील रँक नुसार बक्षीसे घोषित करण्यात आले होते.आंध्र प्रदेश सरकारने एटीएसच्या कामगिरीची दखल घेऊन पोरितोषिकाचा डिमांड ड्राफ्ड पोलीस महासंचालकांच्या नावाने पाठविला आहे़ तो स्वीकारण्यास शासनाने मान्यता दिली आहे़पारितोषिक जाहिर झालेले अधिकारी व कर्मचारीपोलिस उपायुक्त डॉ. मोहन कुमार दहिकर , सहाय्यक आयुक्त सुनील वाडके, पोलीस निरीक्षक संजय एस मराठे, निरीक्षक भास्कर डी. कदम, निरीक्षक संतोष डी. सावंत, सहाय्यक निरीक्षक दशरथ एम विटकर, उपनिरीक्षक विक्रम ए. पाटील, हवालदार अरुण बी. देशमुख, अरविंद एस. मोरे, शहाजी एन. सोनावने, राजेंद्र ए. खरात.