शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अंधारबनातील तरुणांचा अद्याप तपास सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 06:45 IST

मुळशी तालुक्यातील पिंपरी परिसरातील अंधारबनात आपल्या मित्रांसोबत २२ जुलै रोजी पर्यटनासाठी गेले असताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने संध्याकाळी चार ते पाचच्या सुमारास खोल दरीत वाहून

पौड : मुळशी तालुक्यातील पिंपरी परिसरातील अंधारबनात आपल्या मित्रांसोबत २२ जुलै रोजी पर्यटनासाठी गेले असताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने संध्याकाळी चार ते पाचच्या सुमारास खोल दरीत वाहून गेलेल्या त्या दोन तरुणांचा अद्यापही शोध लागलेला नाही.पौड पोलीस स्टेशन, मुळशी तालुका महसूल विभागाचे आपत्ती व्यवस्थापन, पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी, लोणावळा येथील शिवदुर्ग संवर्धनचे कार्यकर्ते, स्थानिक नागरिक व जीवरक्षक दलाचे काही जवान असे एकूण २३ जणांचे पथक युद्धपातळीवर शोध घेत आहेत.२२ जुलै रोजी पुणे येथील काही तरुण मुळशीतील पिंपरी येथे पर्यटनासाठी आले होते. यावेळी ते पिंपरी येथून हिरडी गावाकडे जाणाºया रस्त्याने जंगलातून जात असताना उंच डोंगरावरून वाहत येऊन अंधारबन दरीत जाणारा एक नाला ओलांडत असताना पाण्याच्या वेगाचा अंदाज न आल्याने त्यातील राहुल दुधे (वय ३२) व राहुल उमाटे (वय २९) हे दोघेजण पाय घसरून पाण्याच्या प्रवाहाबरोबरदरीत वाहून गेले होते. या दोघांचा अद्यापही तपास लागलेला नाही. या ठिकाणी होत असलेल्या अतिपावसामुळे व दिवसा पडणाºया अंधारामुळे शोधकार्यात अडचण येत असल्याची माहिती मुळशीतील जीवरक्षक दलाचे कार्यकर्ते प्रमोद बलकवडे यांनी दिली.दुर्घटना घडलेल्या परिसरात व ओढ्याच्या शेवटापर्यंत दोन्ही बाजुने कसून शोध घेण्यात येत आहे. परंतु दोघांचाही पत्ता लागला नाही. हा ओढा पूर्णपणे खडकाळ असल्याने त्यात झाडे, झुडपे नाहीत. त्यामुळे दोघेही खालील दरीत रायगड जिल्ह्याच्या हद्दीत वाहून गेले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत होत; परंतु त्याही ठिकाणी या तरुणांचा तपास लागला नाही. त्याच ठिकाणी काही अंतरावर खडकात ते अडकले असण्याची शक्यता लक्षात घेऊन दरीच्या उगम स्थानीच अधिक तपास करण्याच्या हेतूने मंगळवारी तपास करण्यात आला. या तपास कामात रायगड पोलीस व प्रशासनही मदत करीत आहे. त्यांच्याकडूनही भिरा बाजुने शोध सुरू केला आहे.