शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

...अन् त्यांना पुन्हा मिळाला हक्काचा निवारा

By admin | Updated: November 16, 2016 02:38 IST

ज्यांच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाऊन पै-पै जमा केली; त्यांनीच उतारवयात आई-वडिलांना बेघर केले़ मात्र, अशा अवस्थेतही खचून न जाता आई-वडिलांनी मुलांविरोधात लढा दिला़

नवनाथ शिंदे / पिंपरीज्यांच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाऊन पै-पै जमा केली; त्यांनीच उतारवयात आई-वडिलांना बेघर केले़ मात्र, अशा अवस्थेतही खचून न जाता आई-वडिलांनी मुलांविरोधात लढा दिला़ अखेर तहसीलदारांच्या कार्यवाहीनंतर सत्तरी पार केलेल्या पाटील दाम्पत्याला पुन्हा एकदा हक्काचा निवारा असलेले घर मिळाले. सुरेंद्र नरसगोंडा पाटील (वय ७८) सुनंदा सुरेंद्र पाटील (वय ७३) हे दाम्पत्य निगडीत राहते़ वर्षभरापासून त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांना बेघर केले होते़ उतारवयात दोघांनाही घराच्या माळ्यावरील एका कोपऱ्यात ठेवले. त्यामुळे त्यांचे हाल सुरू होते़ मुलांकडून या वयात अवहेलना सोसवत नव्हती. तरीही त्यांच्याविरोधात लढा देण्याचा निर्णय पाटील दाम्पत्याने घेतला. शासनाच्या ज्येष्ठ नागरिक चरितार्थ व कल्याणकारी कायद्यानुसार पाटील दाम्पत्याने हक्काचा निवारा मिळण्यासाठी २० फे बु्रवारीमध्ये प्रांत कार्यालयाकडे अर्ज दाखल केला़ पाटील यांनी केलेल्या अर्जावर प्रांत कार्यालयाने तातडीने दखल घेतली. दोन्ही मुलांनी आई-वडिलांना पोटगी म्हणून प्रत्येकी अडीच हजार रूपये देण्याचा आदेश दिला़ मात्र, मुलांनी आई-वडिलांना पोटगीची रक्कम दिली नाही़ त्यामुळे पाटील दाम्पत्याने पुन्हा अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे घराचा ताबा मिळण्यासाठी अर्ज दाखल केला़ संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास करून अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी ३० मे रोजी मुलांना घराचा ताबा आई-वडिलांकडे देण्याचा आदेश दिला़ या निर्णयाविरोधात पाटील यांच्या मुलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली़ मात्र, न्यायालयाने अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवत घराचा ताबा पाटील दाम्पत्याला देण्याचा आदेश दिला़ त्यानुसार पिंपरी-चिंचवडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी पोलिसांना आदेश देऊन मुलांना ताब्यातील घर सोडण्यास सांगितले़ अखेर प्रशासनाने त्वरेने घेतलेल्या निर्णयामुळे ८ नोव्हेंबरला पोलिसांच्या सहकार्याने पाटील दाम्पत्याला घराचा ताबा परत देण्यात आला़या सर्व संघर्षात त्यांना कौटुंबिक मित्र असलेले मोहन डोरले यांनी सहकार्य केले.