शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अन् ‘पुरुषोत्तम’चा पडदा उघडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 04:21 IST

अरे... आव्वाज कुणाचा... च्या आरोळ्या..शिट्या आणि टाळ्यांचा कडकडाट अशा अभूतपूर्व जल्लोषात पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचा पडदा उघडला.

 पुणे : अरे... आव्वाज कुणाचा... च्या आरोळ्या..शिट्या आणि टाळ्यांचा कडकडाट अशा अभूतपूर्व जल्लोषात पुरुषोत्तम करंडकस्पर्धेचा पडदा उघडला. व्हीआयटी, कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय आणि अहमदनगर प्रेमराज सारडा या महाविद्यालयांच्या एकांकिकांनी स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या पहिल्या दिवशीची नांदी झाली. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत ५१ संघांमध्ये चुरस रंगणार आहे.‘कौन कितने पानी में हैं?’ हे पहिल्या फेरीतच ठरत असल्यामुळे एकमेकांना शह देण्यासाठी संघांचे तगडे सादरीकरण आणि आपल्या महाविद्यालयाला चिअर अप करण्यासाठी लागलेली चढाओढ, अशा वातावरणात ‘व्हीआयटी’च्या ‘वेध’ या एकांकिकेने स्पर्धेचा श्रीगणेशा झाला.अंतराळातील ग्रहमालांमध्ये पृथ्वीप्रमाणे वस्ती असेल का, याचा शोध घेणाºया शास्त्रज्ञांवर ही एकांकिका आधारली होती.त्यातून इस्रो आणि नासामध्ये चालणारी तात्त्विक स्पर्धा, शास्त्रज्ञांचे कुतूहल त्याच्याशी जोडली गेलेली राजकीय, सामाजिक परिस्थिती अशा अनेक बाबी मांडण्याचा प्रयत्न या एकांकिकेतून करण्यात आला. इस्रोमध्ये काम करणाºया शास्त्रज्ञांनी अर्धवट सोडलेले काम त्यांची मुलगी त्याच स्थानी येऊन पूर्ण करते. विद्यार्थी लेखक अमित भुसारी याने या एकांकिकेचे लेखन केले होते. सानिका पत्की,दिग्विजय अंधोरीकर यांनी नाटकाच्या दिग्दर्शनाची बाजू सांभाळली संगीत आणि प्रकाशयोजना ही एकांकिकेचीजमेची बाजू ठरली.लक्षवेधी विषय‘व्हीआयटी’ ची एकांकिका सादर झाल्यानंतर कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालयाने ‘साकव’ ही एकांकिका सादर केली. मुंबईमध्ये पावसामुळे झालेल्या प्रलयात अडकलेल्या एका कुटुंबाची गोष्ट या एकांकिकेद्वारे सादर झाली. त्यानंतर अहमदनगरच्या प्रेमराज सारडा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘ड्रायव्हर’ ही एकांकिका सादर केली.साध्या गाड्यांवर ड्रायव्हर म्हणून काम करीत असलेला एक गृहस्थ एसटीमध्ये ड्रायव्हर होण्याचे स्वप्न पाहतो. त्यासाठी दहावी उत्तीर्ण होण्याची अट असल्याने तो परीक्षाही देतो; पण त्यात अपयशी होतो. ड्रायव्हरच्या स्वप्नांचा हा प्रवास मांडण्याचा प्रयत्न या एकांकिकेत करण्यात आला होता.