शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पुस्तकांच्या गावी साकारतेय ‘अ‍ॅम्फी थिएटर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 06:14 IST

महाबळेश्वरजवळील भिलार या पुस्तकांच्या गावात आता विविध उपक्रमांसाठी उपयुक्त असे अ‍ॅम्फी थिएटर साकारत आहे.

प्रज्ञा केळकर-सिंग  पुणे : महाबळेश्वरजवळील भिलार या पुस्तकांच्या गावात आता विविध उपक्रमांसाठी उपयुक्त असे अ‍ॅम्फी थिएटर साकारत आहे. एमआयडीसीच्या मदतीने हे ओपन थिएटर बांधले जात आहे. पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्ताने अ‍ॅम्फीथिएटरची सुरुवात केली जाणार आहे.भिलारमध्ये कथा, कादंबरी, कविता, ललित, बालसाहित्य, संतसाहित्य, चरित्र, आत्मचरित्र, विज्ञान, इतिहास, भूगोल, प्रवासवर्णने असे साहित्यातील सर्व प्रकार सुमारे पंधरा हजारांपेक्षा जास्त पुस्तकांच्या माध्यमातून वाचकांना उपलब्ध झाले आहेत. पुस्तकांचे गाव साकारल्यानंतर लगेचच अ‍ॅम्फीथिएटरची संकल्पना पुढे आली. या ओपन थिएटरचे डिझाईन आणि कामासाठी आवश्यक असलेला निधी यासाठी एमआयडीसीने पुढाकार घेतला आहे.सध्या सभागृहाचा पाया बांधून पूर्ण झाला असून, येथे तिन्ही बाजूंनी आसन व्यवस्था, मधोमध सादरीकरणासाठी व्यासपीठ आणि दोन ग्रीनरुम असा आराखडा तयार झाला आहे. एकावेळी २०० रसिक येथील कार्यक्रमांचा आस्वाद घेऊ शकतील, अशी माहिती राज्य मराठी विकास संस्थेचे आनंद काटीकर यांनी ‘लोकमत’ला दिली. प्रकाशक, लेखकांनी पुस्तकांच्या गावी जाऊन आपल्या पुस्तकांचे प्रकाशन करावे, अशी त्यामागील संकल्पना आहे.