शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

कोरोनावर ‘प्राणायामा’ची मात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:10 IST

पुणे : सध्या कोरोनामुळे थेट फुफ्फुसावरच परिणाम होत असून, श्वास घेण्यास त्रास होत आहे. म्हणून ऑक्सिजनची गरज भासत आहे. ...

पुणे : सध्या कोरोनामुळे थेट फुफ्फुसावरच परिणाम होत असून, श्वास घेण्यास त्रास होत आहे. म्हणून ऑक्सिजनची गरज भासत आहे. पण, जर नियमित प्राणायाम केला, तर फुफ्फुसांना ऑक्सिजन कमी पडणार नाही आणि तुमचे फुफ्फुसे बळकट होतील. आता अनेक जणांना प्राणायामचे फायदे समजले असून, ते याकडे वळत आहेत. डॉक्टर देखील प्राणायाम करण्याचे सल्ले देत आहेत.

प्राणायामाचे अनेक प्रकार व लाभ आहेत. सध्या कोरोनामध्ये श्वसन संस्थेवर परिणाम होऊन अनेकजण कोरोनाग्रस्त होत आहेत. फुफ्फुसांवर विषाणू हल्ला करून त्यांची ताकद कमी करत आहे. म्हणून सर्दी-खोकला होऊन प्रतिकारशक्ती कमी पडते. जर प्राणायाम केला तर फुफ्फुसांची शक्ती वाढते आणि ऑक्सिजन मुबलक प्रमाणात मिळतो.

================

प्राणायाम नियमित केल्यास होणारे फायदे -

आत्मिक आनंद मिळतो, स्मरणशक्‍ती वाढते, मनःशांती लाभते, दीर्घआयुष्य प्राप्त होते, आत्मिक साक्षात्कार होते, शरीर सुदृढ व निरोगी राहाते, प्राणयामामुळे अकारण वाढलेली चरबी किंवा मेद घटतो, मन शांत व स्थिर बनते,

प्राणायामामुळे शरीरातील नाड्या शुद्ध होतात, जठराग्नि प्रदीप्त होतो, मनाची एकाग्रता वाढते, शरीराची सुस्ती जाते, नियमित प्राणायाम केल्यामुळे पोट, यकृत, लहान आतडे, मोठे आतडे यांची कार्यक्षमता वाढते आणि पचनक्रिया सुधारते. माणसाला तग धरून रहाण्यासाठी आधुनिक प्रदूषणयुक्‍त जगात वावरताना प्राणायाम करणे गरजेचे आहे.

========================

प्राणायाम म्हणजे शारीरिक व मानसिक स्थैर्य यावे यासाठी केला जाणारा व्यायाम आहे. हा श्वसनाचा व्यायाम. प्राणायाम ही श्वासावर नियंत्रण ठेवणारी एक कला आहे. श्वास घेण्याच्या विविध पद्धती म्हणजे प्राणायाम. उदा- कपालभाती, भ्रामरी, अनुलोम- विलोम, उज्जयी, शितली हे प्राणायामाचे काही प्रकार सांगता येतील. प्राणायाम केल्याने फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. एवढेच नाही तर आपले फुफ्फुस निरोगी होतात व शरीरातील ऑक्सिजनपातळी समतोल राहते. नाक व घशात असलेले अडथळे (घसा खवखवणे, कानाला दडे बसणे इत्यादी) दूर होण्यास मदत होते. 'शितली' प्राणायाम नियमित केल्याने ताप व पित्तविकार कमी होण्यास मदत होते.

- पूजा यादव, योग प्रशिक्षक

-------------------

दररोजच्या ताण-तणावात जगत असताना अनेकदा निराश वाटू शकते .विविध चिंताचे मळभ मनावर येऊ शकते, मलाही असे अनुभव बऱ्याचवेळा आले आहेत. गेली काही वर्षे मी नियमितपणे प्राणायाम करते त्यामुळे मनाची एक वेगळीच प्रसन्नता अनुभवता येते. शिवाय, त्यामुळे माझी दैनंदिन कार्यक्षमता वाढली आहे. प्राणधारणा, अनुलोम-विलोम, भ्रामरी, उज्जयी याचा मला फार उपयोग झाला. आयुष्यात सकारात्मकता येण्यास मदत होते.

- शुभदा कासले, योग साधक

================

प्राणायामामुळे आपल्या शरीरातील विषारी घटक श्वासावाटे बाहेर टाकले जातात. परंतु, केवळ शरीराची शुध्दी नसून मनातील नकारात्मक विचार, ताण, चिंता देखील हळूहळू कमी होत असल्याचा अनुभव नियमित प्राणायाम केल्याने मी घेत आहे. प्राणायामामुळे शरीरात अत्यंत सूक्ष्म पातळीवर नकळत चांगले मानसिक बदल घडून येतात, त्याचा फायदा शारीरिक स्वास्थ्याबरोबर मानसिक स्वास्थ टिकवून ठेवण्यात होतो,असा माझा अनुभव आहे.

- भाग्यश्री चौथाई, योग साधक

===============

प्राणायामामुळे डायफ्रामॅटिक हालचाल होते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. पांढऱ्या पेशींच्या हालचाली वाढण्यास मदत होते. प्राणायाम केल्याने पचनशक्ती सुधारते. फुफ्फुसे मजबूत होतात. शारीरिक, मानसिक, भावनिक आरोग्य चांगले राहते. प्राणायामामुळे नाक मार्ग स्वच्छ होऊन चोंदलेले नाक साफ होण्यास मदत होते. ताण-तणाव दूर होतो.

- सुषमा वाकडे, योग प्रशिक्षक