फळांचा राजा ‘आंबा’ घेण्यासाठी नागरिक मार्केट यार्डासह पुण्याच्या विविध भागांमध्ये भरलेल्या आंबा प्रदर्शनांना भेट देत आहेत. अक्षय तृतीयेचा मुहूर्तापासून साधारणपणे आंबा खायला सुरुवात केली जाते. त्यामुळे बाजारामधून तयार आंब्याला मोठी मागणी आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी मार्केट यार्डातील काही गाळ्यांवर सर्रास ‘कॅल्शियम कार्बाईड’चा वापर सुरू आहे. नागरिकांच्या जिवाशी खेळ करणारा हा प्रकार लोकमतच्या ‘स्टिंग आॅपरेशन’मधून समोर आला. अन्न व औषध प्रशासनाने मार्केट यार्डात काही धाडी टाकून कॅल्शियम कार्बाईडचा साठा जप्त केला असला, तरी अडते व व्यापारीदेखील बिनधास्त कॅल्शियम कार्बाईडच्या भट्ट्या लावत असल्याचे दिसून येत आहे.
आंब्याला कॅल्शियम कार्बाईडचीच मात्रा
By admin | Updated: April 21, 2015 03:09 IST