शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरांना हव्यात लोकसभेच्या दहा जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 05:15 IST

धनगर, ओबीसी, मुस्लिम अशा वंचित जातीतील उमेदवारांना एकत्र घेऊन आगामी लोकसभा निवडणूक लढविणार आहोत.

पुणे : धनगर, ओबीसी, मुस्लिम अशा वंचित जातीतील उमेदवारांना एकत्र घेऊन आगामी लोकसभा निवडणूक लढविणार आहोत. या उमेदवारांना न्याय देण्यासाठी जो पुरोगामी पक्ष आम्हाला दहा जागा देईल, त्यांच्याशी युती केली जाईल. अन्यथा राज्यातील ४८ जागांवर उमेदवार उभा करू, असे भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.पंढरपूर येथे झालेला धनगर समाज मेळावा आणि पुणे येथील भटक्या विमुक्तांची सभा या दोन परिषदानंतर पुढील वाटचाल ठरविण्यासाठी दोन्ही परिषदांच्या आयोजकांची बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राजकारणात घराणेशाही प्रस्थापित झाली असून लोकशाही शेवटच्या माणसापर्यंत पोहचविण्याकरिता प्रयत्न झाले पाहिजेत. धनगर, माळी, ओबीसी आणि मुस्लिम समाजाकरिता प्रत्येकी दोन जागा पक्षामार्फत देण्यात येतील. त्यामुळे दहा जागा देणाऱ्या पुरोगामी पक्षासोबत आम्ही जाऊ. त्या पार्श्वभूमीवर २७ जूनपासून कोल्हापूर येथून राज्यव्यापी दौरा काढणार असून चार ते पाच ठिकाणी सभा घेण्यात येतील. शेतकºयांना किमान हमीभाव मिळणारी व्यवस्था असावी, शिक्षणाचे बाजारीकरण थांबविण्यात यावे, शिक्षणाच्या वेगवेगळया संधीची उपलब्धता, रोजगाराच्या संधी या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार असून त्यावर आॅक्टोबरपर्यंत आराखडा तयार करण्यात येईल.>..तर, पवार यांच्यासोबत जाणार नाहीमाजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना मी पुरोगामी समजत नाही. त्यांनी काही विरोधी पावले उचलली आहेत. पवारांनी काही सुधारणावादी भूमिका मांडली तर त्यांच्यासोबत जाण्याचा विचार केला जाईल. पवारांनी फुले पगडीचा स्वीकार केला याचा आम्हाला आनंद आहे. पुणेरी पगडी ही पेशवाईचे प्रतीक असल्याने त्याला आमचा विरोध आहे, असेही आंबेडकर म्हणाले. एल्गार परिषदेच्या निमित्ताने पोलिसांनी केलेल्या अटकसत्राबाबत आंबेडकर म्हणाले, संभाजी भिडे हे संघाच्या उच्च फळीतील असल्याने त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. पी. बी. सावंत, कोळसे पाटील हे माजी न्यायमूर्ती असल्याने त्यांना पोलीस हात लावू शकत नाहीत. मी सामान्य कार्यकर्ता असल्याने माझ्या विरोधात कारवाई करण्यात येत आहे.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर