शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अॅमेझॉनने पुण्यात सुरु केला फूड रिटेलिंग व्यवसाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 21:01 IST

ऑनलाइन क्षेत्रातील ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने फूड रिटेल व्यवसायात पदार्पण केले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅमेझॉन डॉन इनवर एका व्हेंडरच्या माध्यमातून हा व्यवसाय सुरु आहे.

पुणे : ऑनलाइन क्षेत्रातील ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने फूड रिटेल व्यवसायात पदार्पण केले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅमेझॉन डॉन इनवर एका व्हेंडरच्या माध्यमातून हा व्यवसाय सुरु आहे. सध्या पुण्यात ही सर्व्हिस चालू आहे. यामध्ये प्रॉडक्ट्सची विक्री अॅमेझॉन रिटेल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून करण्यात येत आहे. याचबरोबर, असे समजते की येत्या तीन महिन्यात देशभरात अॅमेझॉन फूड रिटेलिंगचा व्यवसाय सुरु करणार आहे.  गेल्या वर्षी फूड प्रॉडक्टस् ई-रिटेलिंग करण्यासाठी सरकारने अॅमेझॉनला 50 कोटी डॉलरची गुंतवणूक करण्यास मंजुरी दिली होती. यामध्ये कंपनी येथे बनविण्यात येणारे प्रॉडक्टस् आणि पॅकेज्ड फूड प्रॉडक्ट्सची विक्री ऑफलाइन आणि ऑनलाइन करण्यात येणार आहे. याआधी सरकारने 2016 मध्ये शेतक-यांना मदत करण्यासाठी आणि रोजगार वाढविण्यासाठी या क्षेत्रात 100 टक्के एफडीआयला मंजुरी दिली होती. दरम्यान, अॅमेझॉन इंडियाच्या प्रवक्ताने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही भारतात फूड रिटेल व्यवसायात टिकून राहण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे, असे सांगत त्यांनी याबाबत आणखी माहिती दिली नाही. 2016 मध्ये फूड ई-कॉमर्स या क्षेत्रात 100 टक्के एफडीआयला मंजुरी देण्यात आली आहे. त्यावेळी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर यांनी टेस्को  आणि मार्क्स अॅण्ड स्पेंसर्स यासारख्या मोठ्या कंपन्या भारतात आकर्षित करण्यासाठी लंडनमध्ये रोड शो केला होता. दरम्यान, त्यावेळी याला म्हणावा तसा काही प्रतिसाद मिळाला नव्हता.   

टॅग्स :amazonअॅमेझॉन