शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

शहरातील प्रवाशांच्या समस्याही सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:27 IST

पीएमपी प्रशासनाकडून जेजुरी, चाकण, रांजणगांव यांसह विविध भागातील एमआयडीसी, पर्यटन व धार्मिक स्थळांच्या ठिकाणी बससेवा सुरू केली जात आहे. ...

पीएमपी प्रशासनाकडून जेजुरी, चाकण, रांजणगांव यांसह विविध भागातील एमआयडीसी, पर्यटन व धार्मिक स्थळांच्या ठिकाणी बससेवा सुरू केली जात आहे. या भागात अधिकाधिक मार्ग व बस वाढविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी पुमटा, पीएमपीआरडीएकडे संचलन तुटीच्या माध्यमातून आर्थिक मदत व विविध सुविधा मिळण्याची अपेक्षा पीएमपीला आहे. प्रशासनाच्या या भुमिकेला शहरातील प्रवासी संघटना व प्रवाशांनी थेट विरोध केलेला नाही. पण बससेवेचा विस्तार करताना मुळ शहरातील बससेवेकडे दुर्लक्ष होऊ नये, अशी प्रवाशांची मागणी आहे. पीएमपीप्रवासी मंच देखील अनेक वर्षांपासून काही मागण्या करीत आहे. प्रत्येक बस थांब्यावर बसेसचे मार्ग, वारंवारिता, वेळापत्रक व इतर संबंधित माहिती स्पष्टपणे दिसून येईल अशी लावावी, प्रमुख बस थांब्यावर बसण्याच्या व्यवस्थेसह निवारा शेड, पिण्याचे पाणी, किमान महिलांच्या साठी स्वच्छ स्वच्छतागृह, बसेसची माहिती देण्यासाठी स्पीकर, स्वच्छ प्रकाश योजना, बसमधील उपलब्ध डिजिटल स्थलदर्शक पाट्या नियमितपणे योग्य माहितीसह सुरु राहतील याची दक्षता घेणे, काल्पनिक स्टेज नुसार केली जाणारी भाडे आकारणीची पद्धत रद्द करुन, प्रवास अंतरावर आधारित भाडे आकारणी करण्यात यावी, अशा प्रवाशांच्या मागण्या आहेत.

-----------

वातानुकूलित विमानतळ सेवा, टोलनाक्यापलीकडे सेवा, जिल्हाभर पीएमपीचा विस्तार करा. पण त्याचबरोबर पीएमपीचा संपूर्ण असह्य भार आपल्या खांद्यावर वाहणाºया पुणे, पिंपरी-चिंचवड येथील लाखो सामान्य प्रवाशांचेही काही प्रश्न प्रलंबित आहेत, त्यांचाही विचार व्हावा ही कळकळीची आहे.

- जुगल राठी, अध्यक्ष, पीएमपी प्रवासी मंच

-------------

पुणे व पिंपरी चिंचवडच्या नागरिकांना भरवश्याची बस सेवा पुरवल्या नंतर हद्दीबाहेर बस सेवा पुरवण्यात हरकत नाही. पण स्थानिक प्रशासनाने पीएमपीला आवश्यकता असलेल्या सुविधा, नवीन बसेस, बस डेपोसाठी जागा द्यावी.

- रुपेश केसकर, प्रवासी

--------