शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

'' हातवळणीच्या उकडीच्या मोदकांची '' बारमाही गोडी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 07:00 IST

कुणाचा वाढदिवस असो किंवा गेट टूगेदर असो किंवा कुणी घरी जेवायला येणार असो अशावेळी हातवळणीच्याच उकडीच्या मोदकांना अधिकांश पसंती दिली जात आहे.

ठळक मुद्देपुण्यात वर्षभरात 15 लाखांपेक्षाही अधिक मोदकांची विक्री मोदकांचे तळलेले, नारळाचे, खव्याचे, बालुशाही, चॉकलेट, पिस्ता, मँगो असे नानाविविध प्रकार

पुणे : ’संकष्टी चतुर्थी’, गणेशजयंती’, विनायकी चतुर्थी’,  ‘अंगारकी’ आणि  ‘गणेशोत्सव’ या दिवसांव्यतिरिक्तही आता उकडीच्या मोदकांची ’बारमाही’ गोडी पुणेकरांना लागली आहे. कुणाचा वाढदिवस असो किंवा गेट टूगेदर असो किंवा कुणी घरी जेवायला येणार असो अशावेळी हातवळणीच्याच उकडीच्या मोदकांना अधिकांश पसंती दिली जात असल्याने मोदकांना दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. पुण्यात वर्षभरामध्ये घरगुती, मिठाईची दुकाने, व्यावसायिक यांच्या माध्यमातून जवळपास 15 लाखांपेक्षाही अधिक मोदकांची विक्री होत आहे.  आजमितीला मोदकांचे तळलेले, नारळाचे, खव्याचे, बालुशाही, चॉकलेट, पिस्ता, मँगो असे नानाविविध प्रकार उपलब्ध असले तरी हातवळणीच्या उकडीच्या मोदकांनाच ग्राहकांकडून अधिक मागणी आहे.  पूर्वीच्या काळी चतुर्थी आणि गणेशोत्सव काळात घरोघरी मोदक करण्याची प्रथा होती. मात्र नोकरीनिमित्त महिलांनी घराचा उंबरठा ओलांडल्यामुळे ही प्रथा कालपरत्वे  कमी झाली आहे. त्यामुळेचं गेल्या काही वर्षात तयार मोदकांच्या खरेदीकडेच कुटुंबांचा कल वाढला आहे. पुण्यातील बहुतांश गृहिणींनी घरबसल्या मागणीनुसार उकडीचे मोदक तयार करून देण्याच्या व्यवसायात पाय रोवायला सुरूवात केली आणि आज त्याची एक बाजारपेठच आकाराला आली आहे. संकष्टी किंवा गणेशोत्सव वगळताही वर्षभर हातवळणीच्या उकडीच्या मोदकांना प्रचंड मागणी असून, दिवसेंदिवस ही मागणी वाढतच चालली आहे. एका मोदकाचे मूल्य हे 22 ते 35 रूपयांच्या घरात आहे. मोदकाच्या आकारानुसार त्याचा दर ठरलेला असतो.  एका गृहिणींचे वर्षभरात जवळपास दीड ते दोन हजार मोदक  तर मिठाई दुकानं आणि व्यावसायिक यांच्या मार्फत दिवसाला 5 हजार मोदकांची विक्री होते. यावरून मोदकाच्या आर्थिक उलाढालीचा नक्कीच अंदाज येऊ शकतो. अनेक महिलांना उकडीच्या मोदकांमुळे रोजगार उपलब्ध झाला आहे. याविषयी काही धरगुती मोदक आॅर्डरनुसार तयार करून देणा-या महिला आणि व्यावसायिकांशी ‘लोकमत’ने संवाद साधला. विद्या ताम्हणकर म्हणाल्या, मोदक हा पदार्थ असा आहे की तो पचायला हलका आहे. त्यामुळे मोदकाला गोड पदार्थ म्हणून नेहमीच पसंती दर्शविली जाते. वर्षभरात मोदकांना खूप मागणी असते. मी वर्षभरात दीड ते दोन  हजार मोदक करते.   मोदक करणं हे खूप कष्टाचं काम असल्यामुळे आॅर्डरनुसारच  मोदक तयार करून दिले जातात. त्यासाठी उकड नीट होणं आवश्यक असतं. मोदक वळणं आणि कळीदारं होणं हे देखील कौशल्याचं काम आहे.मोदकं  दोन दिवसं आधी करून ठेवता येत नाही. नारळं खरवडणं, सारणं करणं, उकड काढणं, मळणं या गोष्टी कराव्या लागतात.या व्यवसायामुळे घराला काहीप्रमाणात हातभार लागत आहे. साधारण मोदकाव्यतिरिक्तही ’रेम्बो’ मोदक  मी करते. गौरीच्या दिवशी याला मागणी असते. उकडीच्या मोदकांचा साईज हा मोठा असल्याने 30 रूपये दराने मोदक विकते. माधुरी वराडे यांनी उकडीच्या मोदकाला ‘बारमाही’ मागणी असल्याला दुजोरा दिला. त्या म्हणाल्या, मी गेल्या वर्षीपासूनच उकडीचे मोदक तयार करून देण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. पण मोदकांना मागणी नाही असा एकही दिवस गेलेला नाही. वर्षभरात दोन ते तीन हजार मोदकांची विक्री होते. हॉटेल व्यावसायिक किशोर सरपोतदार म्हणाले, आमच्याकडे दररोज 2 हजार उकडीच्या मोदकांची विक्री होते. चतुर्थीला लागणारा मोदक सर्व बाजारपेठेत आज उपलब्ध आहे. मोदकाला इतकी मागणी आहे म्हणूनच तो विकला जातो. जिथे गणपती मंदिर असतात त्याच्या आसपास च्या दुकानांमध्ये उकडीचे मोदक दिले जातात. याशिवाय आठवड्याला 10 हजार मोदक हे पुण्याबाहेर जातात. घरगुती महिलाही मोदक तयार करतात. आमच्यासारखेच इतर व्यवासायिक दिवसाला 3 हजार मोदक इतर दिवशी विकतात. चतुर्थीला हे मोदक 15 हजार जातात. गणेश चतुर्थीच्या दहा दिवसात आमचे सव्वा लाख मोदक जातात. वर्षभर मोदकांना मागणी असते.  एका मोदकाची किंमत दुकानांमध्ये 22 ते 25 रूपये तर घरगुती किंमत 30 रूपये आहे. मोदकांच्या वाढत्या मागणीमुळे आर्थिक बाजारपेठ तयार झाली आहे, यात शंकाच नाही. --------------------------------------------------उकडीच्या मोदकांना महागाईचा फटका कोकणातल्या स्थितीमुळे नारळ महागला आहे. गूळ आणि तांदूळाच्या पिठीचे भावही वाढलेले आहेत. नारळ आणि मजुरीमध्ये झालेली वाढ याचा फटका मोदकांना बसल्यामुळे एका नगामागे मोदकांमध्ये 2 रूपयांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :Puneपुणे