पुणे : कोरोना टाळेबंदी, निर्बंध यामुळे सर्वच नागरिक बेजार झाले आहेत. केंद्र सरकारने याचा विचार करून सर्वच रेशनकार्ड धारकांना स्वस्त दरामध्ये धान्य द्यावे, अशी मागणी काँगेसने केली. कोरोना रुग्ण सहायता केंद्र समन्वय समितीची बैठक काँग्रेस भवनमध्ये बुधवारी झाली. त्यात माजी आमदार मोहन जोशी यांनी केंद्र सरकारकडे अशी मागणी करण्याचा ठराव मांडला.
शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, कोरोनाच्या पहिल्या टाळेबंदीच्या वेळेस केंद्र सरकारने असा निर्णय घेतला होता. आता दुसऱ्या लाटेतील स्थिती अधिक बिकट आहे. रोजगार बंदमुळे सगळेच अडचणीत आले आहेत. किमान दरात धान्य मिळाले तर त्यांना आधार होईल. माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, दीप्ती चवधरी, ॲड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, अरविंद शिंदे, अविनाश बागवे, गोपाळ तिवारी, रवींद्र धंगेकर, रमेश अय्यर, हेमंत बागूल, राजेंद्र शिरसाट, यासीन शेख, मंजूर शेख, अमीर शेख, सोनाली मारणे, विशाल मलके, भूषण रानभरे उपस्थित होते.