शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

धनकवडीच्या बागा बनल्या मद्यपींचे अड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 02:44 IST

मद्यपी आणि प्रेमीयुगलांनी सोसायटीच्या गार्डन, अ‍ॅमेनिटी स्पेसवर (जागा) कब्जा केल्याचे चित्र धनकवडी येथील काही सोसायटी परिसरात दिसून येत आहे.

धनकवडी - मद्यपी आणि प्रेमीयुगलांनी सोसायटीच्या गार्डन, अ‍ॅमेनिटी स्पेसवर (जागा) कब्जा केल्याचे चित्र धनकवडी येथील काही सोसायटी परिसरात दिसून येत आहे. महिला, मुली, ज्येष्ठ नागरिकांना अशा अनोळखी व्यक्तींचा वावर त्रासदायक ठरत आहे.धनकवडी परिसरातील मध्य वस्तीमध्ये बंगलो सोसायट्यांची संख्या जास्त आहे. हा परिसर अत्यंत निसर्गसंपन्न आणि शांत आहे. या परिसरातील रस्त्यावर वाहतूक अत्यंत कमी प्रमाणात असते. रहदारी नसल्यामुळे निर्मनुष्य परिसराचा फायदा घेत प्रेमीयुगलांनी या परिसरात अड्डा केला आहे. सोसायटीचे गार्डन आणि अ‍ॅमेनिटी स्पेस या मद्यपींसाठी हुकमी ठरत आहेत. या अनोळखी व्यक्तींच्या घुसखोरीमुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, मुलींसाठी असुरक्षित वातावरण ठरत आहे.मद्यपान करताना होणारा आरडाओरडा, धिंगामस्ती, अनेकदा होणारे वाद याचा परिणाम रहिवाशांवर होत आहे. हटकणाऱ्या काही ज्येष्ठ नागरिकांशी वाद आणि पर्यायाने अनेकदा हाणामारीही होत आहे. त्यामुळे वाद-विवादात न पडता निमूटपणे राहणाºया नागरिकांसाठी हा वावर सातत्याने धोकादायक ठरत आहे.राजमुद्रा सोसायटी, राघवनगर सोसायटी, बाळकृष्ण सोसायटी, नित्यानंद सोसायटी, आदिशक्ती सोसायटी, रक्षालेखा सोसायटी, गुलाबनगर सोसायटीमध्ये या अनोळखी लोकांचा वावर रहिवाशांना त्रासदायक ठरत आहे.सकाळी, संध्याकाळी व रात्री हा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. या परिसरात पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवून कारवाईकरण्याची मागणी नागरिक करीत आहेत.सोसायटीच्या परिसरात मद्यपी व प्रेमीयुगलांचा वावर आणि होणाºया गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सोसायटींनी सुरक्षारक्षकांनी नेमणूक करावी तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, हा परिसर सीसीटीव्ही कॅमेºयांच्या कक्षेत आहे, असा फलक असेल तर हे प्रमाण निश्चितच कमी होईल त्याचप्रमाणे पोलिसांनीही सातत्याने कारवाया करण्याची गरज आहे.- युवराज रेणुसेसोसायटीच्या अंतर्गत रस्त्यांवर, गार्डनमध्ये असे काही अनुचित प्रकार घडत असतील तर नागरिकांनी, सोसायटीमधील पदाधिकाºयांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. आम्ही योग्य ती कारवाई करू तसेच मुख्य रस्त्यांवर आमचे पेट्रोलिंग सुरूच असते.- अनिल शेवाळे, सहकारनगरपोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक

टॅग्स :Puneपुणे