शहरं
Join us  
Trending Stories
1
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
2
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
3
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
4
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
6
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
7
'वैभव'शाही वर्ष! १४ वर्षांच्या पोरानं MS धोनी-विराटला मागे टाकत सेट केला आपला ट्रेंड
8
"इम्रान खान 'वेडा', त्याची विधाने देशाविरोधी अन् चिथावणीखोर"; पाकिस्तान आर्मीचा मोठा दावा
9
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
10
IND vs SA वनडेआधी मोठी दुर्घटना टळली, फॅन्सच्या गर्दीमुळे होती चेंगराचेंगरीची भीती (VIDEO)
11
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
12
Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले...
13
“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले?
14
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
15
Viral Video : 'क्या खूब लगती हो...'; गाण्यावर रील बनवताना घसरून धपकन पडली महिला, व्हिडीओ बघून लोक म्हणाले-
16
उर्मिला मातोंडकरसोबत जास्त सिनेमे, दोघांचं होतं अफेअर? राम गोपाल वर्मांनी सोडलं मौन; म्हणाले...
17
VIDEO: कुछ तुफानी हो जाए ! टायरच्या ढिगावर उभा राहिला तरुण, फुल स्पीडमध्ये आली कार अन्...
18
मीडिया, कला आणि खेळाचा त्रिवेणी संगम: 'जय हिंद'च्या ‘कॉन्स्टीलेशन २५-२६’ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
19
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पीएम मोदींसोबतच्या बैठकीत पुतिन यांचे मोठे विधान, म्हणाले...
20
'या' ८ म्युच्युअल फंड्सनी दिले नेगेटिव्ह रिटर्न; 'या' क्षेत्रातील फंडांचा समावेश, कशी ओळखायची जोखीम?
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीत वाहतुकीचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: May 6, 2015 05:52 IST

अलंकापुरीतील वाहतूककोंडीची समस्या काही केल्या मार्गी लागत नसल्याची सत्यस्थिती समोर येत आहे.

शेलपिंपळगाव : अलंकापुरीतील वाहतूककोंडीची समस्या काही केल्या मार्गी लागत नसल्याची सत्यस्थिती समोर येत आहे. विवाह कार्यालयांची भररस्त्यावर बेशिस्तरीत्या होत असलेल्या पार्किंगमुळे वाहतूककोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. आज सकाळपासून शहरील सर्वच रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रवाशांना स्वता: वेळ घालून प्रयत्न करावे लागत आहे. विवाह कार्यालयांच्या बाहेर भररस्त्यावर बेशिस्त केल्या जाणाऱ्या पार्किंगवर पोलीस प्रशासन कारवाई का करीत नाही? असा सवाल समोर येऊ लागला आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये तासनतास वाहन चालकांना ह्यब्रेकह्ण लावून ताटकळत उभे राहावे लागत आहे. सायंकाळच्या वेळी भररस्त्यात छोट्या झ्र मोठ्या व्यावसायिकांचे होणारे अतिक्रमण या समस्येत अधिक भर घालत असल्याची सत्यस्थिती आहे. बेशिस्त वाहन चालकांमुळे काही ठिकाणी वाहनचालकांमध्ये वाहने मागे झ्र पुढे घेण्यावरून वाद होण्याच्या घटना फोफावत चालल्या आहेत. तर वाहतूक कोंडीतून मार्ग काढणा?्या दुचाकी महागड्या चारचाकी वाहनांना घासून जात असल्याने अनेक ठिकाणी ह्यतु- तु मै झ्र मैह्णची परिस्थिती निर्माण होत आहे. सध्या विवाह सभारंभाचे अधिक मुहर्त असल्याने आळंदी नित्याने गजबजलेली असते. शहरातील विविध ठिकाणची विवाह कार्यालये, धमर्शाळा, मंदिरे आदी ठिकाणी विवाह सभारंभ पार पडत असल्याने बाहेरील गावावरून व?्हाडी लोकांची अनेक वाहने सातत्याने अलंकापुरीत येत असतात. मात्र अशा वाहनांना आळंदीतील वाहतूक कोंडीचा सामना करत इच्छितस्थळी पोहोचावे लागत आहे. मनस्ताप सहन करून सर्वच वाहनचालकांना मार्ग काढावा लागत आहे. आज दिवसभर आळंदीतील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत होऊन शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहनांच्या लांबच झ्र लांब रांगा लागल्या होत्या. चाकण आद्योगिक वसाहतीकडून आळंदीमार्गे पुणे झ्र नगर मार्गाकडे जाणार्या अवजड वाहनामुळे वाहनांच्या रांगा अधिक होत होत्या. चाकण चौक, नगरपालिका चौक, पोलीस ठाणे परिसर, मरकळ चौक, वडगाव चौक आदी ठिकाणी वाहतूककोंडीची समस्या अधिक प्रमाणात होत आहे. शहरात ठिकठिकाणी असलेले अरुंद रस्ते वाहतूक कोंडीच्या समस्येत अधिक भर घालत आहेत. मरकळ रस्त्यावर ऊस मालाची वाहतूक करणारा अवजड कंटेनर भर रस्त्यावर नादुरुस्त होऊन उभा राहिल्याने शहरात येणा?्या वाहनांना मोठा अडथळा निर्माण झाला होता. तर वडगाव रस्त्यावर ज्ञानसागर मंगल कार्यालयासमोर उभ्या असलेल्या अवजड कंटेनरमुळे सर्वच वाहतूक सुमारे दीडतास ठप्प झाली होती. तर कोसमोस बँकेशेजारी रस्त्यावर असलेल्या मोठ्या खड्यामुळे वाहनचालकांना कसरत करून मार्गस्थ व्हावे लागत आहे. शहरातील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी आळंदी पोलिसांना चांगलाच घाम गाळावा लागला. (वार्ताहर)वाहनचालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे अजिबात पालन होत नाही. शहरातील अरुंद रस्त्यांमुळे वाहतुकीची समस्या अधिक जाणवते. मंगळवारी संपूर्ण शहरात वाहतूककोंडी झाली होती. मात्र, स्वत: माझ्यासह ८ ते ९ पोलीस कमर्चारी वाहतूक नियंत्रण करीत होते. बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.- कुमार कदम, पोलीस निरीक्षक, आळंदी