शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

माऊलींच्या स्वागतासाठी आळंदी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 01:32 IST

ज्ञानोबा-माऊली' असा नामजयघोष, टाळ-मृदंगाच्या गजरात श्री ज्ञानेश्वर-माऊलींचा वैभवी पालखी सोहळा उद्या मंगळवारी (दि.७) आषाढीवारीनंतर अलंकापुरी नगरीत प्रवेशत आहे.

आळंदी : ज्ञानोबा-माऊली' असा नामजयघोष, टाळ-मृदंगाच्या गजरात श्री ज्ञानेश्वर-माऊलींचा वैभवी पालखी सोहळा उद्या मंगळवारी (दि.७) आषाढीवारीनंतर अलंकापुरी नगरीत प्रवेशत आहे. पालखी सोहळ्याच्या स्वागतास अलंकानगरी सज्ज झाली आहे. बुधवारी (दि.८) आळंदीत ‘श्रीं’च्या पालखीची नगरप्रदक्षिणा होणार आहे.३२ दिवसांच्या प्रवासानंतर माऊलींच्या आषाढी वारीचा आनंद सोहळा अलंकापुरीत पुण्यातील प्रथमच परतीच्या प्रवासात ३ दिवसांच्या मुक्कामानंतर प्रवेश करणार आहे.आळंदीत आषाढी एकादशीदिनी दिंड्यांच्या हजेरीच्या कार्यक्रमांनी बुधवारी (दि. ८) हरिनामजयघोषात सोहळ्याची सांगता होणार आहे.‘श्रीं’च्या पालखी सोहळ्याच्या स्वागतास येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालयासह आळंदी नगर परिषद शाळांतील मुले, वारकरी, भाविक, नागरिक, बॅण्ड पथक, परंपरेने स्वागत करण्यास माऊली मंदिरातून दिंडी आणि महानैवेद्य हरिनाम गजरात जाणार आहे.पालखी सोहळा आळंदीत प्रवेशताच हरिनाम गजरात स्वागत होणार आहे. आळंदीच्यानगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष सागर भोसले, आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माउलीवीर, विष्णुबुवा चक्रांकित महाराज परिवार आदींसह आळंदीकर नागरिक भाविक आळंदीत स्वागत करणार आहेत.इंद्रायणी नदी किनाऱ्यावरील वेशीवर भागेश्वरी धर्मशाळेजवळ सोहळ्याचे प्रथम स्वागत होईल. या ठिकाणी आरती व पूजा झाल्यानंतर दही-भाताचा महानैवेद्य वाढविण्यात येईल.त्यानंतर सोहळ्यातील वैभवी बाळासाहेब भोसले यांचा सनई चौघड्याचा आकर्षक नगारखान्याच्या आळंदीत प्रथम होत श्रींचा वैभवी पालखी सोहळा आळंदीत प्रवेशल.>पिठलं भाकरी महाप्रसादपालखीची नगरप्रदक्षिणाबुधवारी (दि.८) एकादशी असल्याने माऊलींची पालखी नगरप्रदक्षिणेस सकाळी साडेअकराच्या सुमारास मंदिरातील देऊळवाड्यातून बाहेर येईल. हजेरी मारुती मंदिरात बारा वाजता दिंड्यांची हजेरी होणार आहे. येथे प्रथेने दिंड्याची हजेरी नारळ प्रसाद वाटप होणार आहे. विष्णुबुवा महाराज चक्रांकित यांच्या वतीने श्री नरसिंह सरस्वती स्वामीमहाराज मूळपीठावर पिठलं-भाकरी महाप्रसाद वाटप परंपरेने मंगळवारी (दि.७) करण्यात येणार आहे. तसेच, येथील विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील भाविकांना अन्नदान सेवा देण्यात येणार आहे.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारी