शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

शिवेंद्रराजे यांची अजित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:13 IST

बारामती : सातारचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आज बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे ...

बारामती :

सातारचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आज बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मात्र, ही भेट राजकीय नसल्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केलेले सातारचे आमदार शिवेंद्रराजे यांनी रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामतीत भेट घेतली. येथील विद्या प्रतिष्ठान मध्ये बंद खोलीत बराच वेळ चर्चा झाली. या चर्चेदरम्यान बंद खोलीत दोघांशिवाय अन्य कोणालाही प्रवेश नव्हता. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार शिवेंद्रराजे यांची जवळीक वाढल्याचे दिसून येत आहे. तसेच पवार यांच्या सातारा दौऱ्यावेळी शिवेंद्रराजे भोसले यांनी पवार यांची भेट घेतली होती. आता ते थेट बारामतीला भेटीसाठी आले होते. या दोघांच्यात बंद खोलीत झालेल्या चर्चेचा तपशील मिळाला नाही. या चर्चेनंतर शिवेंद्रराजे भोसले यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की, माझ्या मतदारसंघातील विकासकामासंबंधी चर्चेसाठी पवार यांच्या भेटीला आलो असल्याचे सांगितले. या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नाही, असे त्यांनी सांगितले.

शिवेंद्रराजेंच्या कामासाठी मंत्रिमंडळाची

बैैठक लावणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

विकास कामासंदर्भात आमदार खासदारांचे एकमेकांना भेटणे होत असते. मी विरोधी पक्षात असताना विकासकामाबाबत त्या वेळच्या राज्यकर्त्यांकडे माझी कामे घेऊन जात होतो. तशीच सातारा मतदारसंघाच्या विकासकामासंदर्भात शिवेंद्रराजे भोसले यांनी भेट घेतली. त्यांची जी कामे आहेत, त्या कामासंदर्भात मंत्रिमंडळात बैठक लावतो, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे माध्यमांशी बोलताना दिले.

युतीचे सरकार असताना भाजपकडून मला पक्षप्रवेशाची आॅफर देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी केला. भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात अनेक नेत्यांना पक्षप्रवेशाच्या आॅफर देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये माझाही समावेश होता, असा दावा शशिकांत शिंदे यांनी नुकताच केला आहे. यावर बोलताना पवार म्हणाले की, यासंदर्भातील वृत्त मी माध्यमावर पाहिले आहे. याबाबत शिंदे यांच्याशी चर्चा करून पक्ष प्रवेशाची आॅफर कोणी व कशासाठी दिली होती याची इत्थंभूत माहिती घेतल्याशिवाय अधिक बोलणे उचित ठरणार नाही, अशी प्रतिक्रिया पवार यांनी व्यक्त केली.

नोकरभरतीत कोणताही समाज वंचित राहणार नाही..

नागरिकांचे आरोग्य व कायदा सुव्यवस्था चांगले ठेवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय विभाग व पोलीस खात्यातील भरती करणे अत्यंत गरजेचे आहे. या संदर्भात मी मागेच संबंधितांशी बोललो आहे. भरती करत असताना मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयात निर्णय प्रक्रिया चालू आहे. जानेवारीत याबाबत निर्णय अपेक्षित होता. मात्र आरक्षणाचा निर्णय फेब्रुवारीमध्ये गेला आहे. मात्र राज्यात वेगवेगळी नोकरभरती होत असताना कोणताही समाज घटक वंचित राहणार नाही, याबाबत महाविकास आघाडीचे सरकार कटिबद्ध असल्याचे पवार यांनी सांगितले.