शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळ भूसंपादन निर्णय दिल्लीतील बैठकीनंतर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 00:25 IST

पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाबाबत बुधवारी मुंबई येथे झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. मात्र, येत्या २३ एप्रिल रोजी दिल्लीत केंद्रातील अधिकाऱ्यांबरोबर होणा-या बैठकीत विमानतळाच्या भूसंपादनासह इतर मुद्यांवर निर्णय होण्याची शक्यता आहे.

पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाबाबत बुधवारी मुंबई येथे झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. मात्र, येत्या २३ एप्रिल रोजी दिल्लीत केंद्रातील अधिकाऱ्यांबरोबर होणा-या बैठकीत विमानतळाच्या भूसंपादनासह इतर मुद्यांवर निर्णय होण्याची शक्यता आहे.गेल्या काही महिन्यांपासून पुरंदर विमानतळाबाबत राज्य व केंद्रीय स्तरावरील वरिष्ठ अधिकाºयांच्या वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या. पुरंदर विमानतळाला हवाई दलाने मान्यता दिल्यानंतर जिल्हा प्रशासन व राज्य शासनाकडून पुढील कार्यवाहीसाठी तातडीने हालचाली केल्या जात आहेत. गेल्या महिन्यात यासंबंधीची बैठक मुंबई येथे पार पडली. त्यामध्ये विमानतळासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला (एमएडीसी) स्वतंत्र प्राधिकरणाचा दर्जा देण्याविषयी चर्चा झाली. परंतु, त्याविषयीची अधिसूचना अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे शेतकºयांकडून केल्या जाणाºया भूसंपादनाच्या मोबदल्यात रक्कम दिली जाणार की जमीन दिली जाणार याबाबत निश्चिती झालेली नाही. तसेच यासंदर्भातील सविस्तर अधिसूचनाही प्रसिद्ध झालेली नाही.राज्य सरकार आणि ‘एमएडीसी’मध्ये बुधवारी पुरंदर व नवी मुंबई विमानतळ याविषयी बैठक झाली. या बैठकीस पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव उपस्थित होते. मात्र, या बैठकीमध्ये मुंबई विमानतळाबाबत अधिक चर्चा झाली. पुरंदर विमानतळासंबंधी महत्त्वाची चर्चा झाली नाही.परंतु, येत्या २३ एप्रिलला नागरी हवाई वाहतूक मंत्रालय, भारतीय विमानतळ प्राधिकरणासह ‘एमएडीसी’च्या अधिकाºयांची बैठक होणार आहे. त्यात विमानतळ भूसंपादनाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.दरम्यान, विमानतळाच्या भूसंपादनास विलंब होत असल्याने येत्या आठवड्यात भूसंपादनासंदर्भातील सविस्तर अध्यादेश प्रसिद्ध केला जाऊ शकतो, अशी चर्चा जिल्हा प्रशासनातील अधिकाºयांकडून केली जात आहे.