शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मांसाहार विक्रीच्या दुकानांमुळे विमान उड्डणामध्ये अडथळे

By admin | Updated: May 6, 2015 06:30 IST

लोहगाव विमानतळाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे चिकन-मटणची दुकाने सुरूअसून, हे दुकानदार कचरा, मेलेल्या जनावरांचे अवशेष परिसरात टाकतात.

पुणे : लोहगाव विमानतळाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे चिकन-मटणची दुकाने सुरूअसून, हे दुकानदार कचरा, मेलेल्या जनावरांचे अवशेष परिसरात टाकतात. यामुळे भटकी कुत्री, अन्य प्राणी व पक्षी येथे जमा होऊन विमान उड्डाणामध्ये अडथळा येत आहे. यामुळे विमान धावपट्टीवर उतरताना व हवेत उड्डाण करताना विमानाचे अपघात होण्याची शक्यता आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून, या सर्व अनधिकृत दुकानांवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.लोहगाव एअरफोर्स स्टेशनच्या अ‍ॅरोस्पेस सेफ्टी सेक्शनच्या वतीने जिल्हाधिकारी सौरभ राव यांना लेखी पत्र दिले आहे. यामध्ये विमान अपघातास कारणीभूत असणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या पत्रामध्ये लोहगाव विमानतळाच्या परिसरात तब्बल ४० पेक्षा अधिक अनधिकृत चिकन-मटण यांची दुकाने आहेत. हे दुकानदार विमानतळाच्या आजूबाजूलाच दुकानातील कचरा टाकतात. यामुळे मोठ्या प्रमाणात घारी, अन्य पक्षी, भटकी कुत्री येथे जमा होतात. अनेक वेळा भटकी कुत्री विमनतळाच्या धावपट्टीपर्यंत येतात. विमान उड्डाणाच्या व लँडिंग करताना घारी, पक्ष विमानच्या मध्ये येतात. यामुळे विमानाचा मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबत त्वरित कारवाई करण्याची मागणी करणारे पत्र विमानतळ प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. ४निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश जाधव यांनी सांगितले, की याबाबत पुणे महानगरपालिका, जिल्हा आरोग्य अधिकारी, प्रदूषण महामंडळ, ग्रामीण पोलीस अधीक्षक आदी सर्वांना लेखी आदेश देऊन या दुकानदारांवर व या कचऱ्यासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.