शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लोहगावमधील एअरफोर्सचे प्रतिबंध कमी करण्यासाठी प्रयत्न करणार : अनिल शिरोळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 12:45 IST

स्वमालकीच्या जमिनी असूनही काहीच करता येत नसून साधे झाडही लावण्यास सक्त मनाई आहे. ९०० मीटरचे प्रतिबंध कमी करण्याची मागणी हे शेतकरी अनेक वर्षे करत आहे.

ठळक मुद्दे प्रतिबंध ९०० ऐवजी ३०० मीटरवर आणण्याचे आश्वासन

विश्रांतवाडी : लोहगावमधील एअरफोर्स स्टेशन व एअरफोर्सच्या बॉम्बसाठ्यापासून असलेले प्रतिबंध ९०० मीटरवरून ३०० मीटरपर्यंत कमी आणण्यासाठी केंद्र शासनाकडे पूर्ण ताकदीने पाठपुरावा करण्याचे आश्वासन खासदार अनिल शिरोळे यांनी दिले.    लोहगावमधील स्थानिक शेतकरी व नागरिकांनी भाजपचे पुणे शहर चिटणीस महेंद्र गलांडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी ( दि. २६) शिरोळे यांची भेट घेऊन एअरफोर्स स्टेशनच्या निर्बंधामुळे निर्माण झालेल्या अडचणी सोडवण्यासंदर्भात निवेदन दिल्यानंतर शिरोळे यांनी हे आश्वासन दिले. यावेळी लोहगावच्या नागरिकांच्या वतीने महेंद्र गलांडे यांच्यासमवेत लोहगावचे माजी उपसरपंच प्रितम खांदवे पाटील,सुनील खांदवे पाटील, प्रशांत खांदवे, विशाल खांदवे उपस्थित होते. एअरफोर्सच्या ९०० मीटर प्रतिबंधामुळे बाधित शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहे. याठिकाणी स्वमालकीच्या जमिनी असूनही काहीच करता येत नसून साधे झाडही लावण्यास सक्त मनाई आहे. ९०० मिटरचे प्रतिबंध कमी करण्याची मागणी हे शेतकरी अनेक वर्षे करत आहेत, ही बाब शिरोळे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.         शिरोळे म्हणाले, की जर देशातील इतर एअरफोर्स स्टेशनचे प्रतिबंध ९०० वरुन ३०० मीटरपर्यंत कमी केले असतील तर लोहगावमध्येही हा नियम लागू झाला पाहिजे. आपण स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. जर त्यांच्यावर अन्यान्य झाला असेल, तर हा अन्याय दूर करण्यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे शिरोळे म्हणाले. 

टॅग्स :Vishrantwadiविश्रांतवाडीairforceहवाईदलLohgaonलोहगावanil shiroleअनिल शिरोळे