शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

हवाईदल-इस्रोची संयुक्त अंतराळ मोहीम, अंतराळात मानव पाठविण्यासाठी तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 10:49 IST

अंतराळात मानव पाठविण्याच्या मोहिमेची तयारी सुरू झाली असून, यासाठी इस्रो आणि हवाईदल यांच्यात संयुक्त प्रयत्न सुरू झाले आहेत, अशी माहिती लष्करी वैद्यकीय सेवेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल बिपीन पुरी यांनी गुरुवारी दिली.

ठळक मुद्देअंतराळात मानव पाठविण्याच्या मोहिमेची तयारी सुरू झाली असून, यासाठी इस्रो आणि हवाईदल यांच्यात संयुक्त प्रयत्न सुरू झाले आहेत.लष्करी वैद्यकीय महाविद्यालय (एएफएमसी) तर्फे ६७व्या वार्षिक लष्करी वैद्यकीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. अंतराळात मानव पाठविण्याचा पंतप्रधान यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. २०२२ पर्यंत अंतराळात भारतीय मानवाला पाठविण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

पुणे : अंतराळात मानव पाठविण्याच्या मोहिमेची तयारी सुरू झाली असून, यासाठी इस्रो आणि हवाईदल यांच्यात संयुक्त प्रयत्न सुरू झाले आहेत, अशी माहिती लष्करी वैद्यकीय सेवेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल बिपीन पुरी यांनी गुरुवारी दिली.लष्करी वैद्यकीय महाविद्यालय (एएफएमसी) तर्फे ६७व्या वार्षिक लष्करी वैद्यकीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात भारतीय लष्कराच्या तिन्ही दलातील वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले आहेत. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत पुरी बोलत होते.पुरी म्हणाले की, या प्रकल्पांतर्गत अंतराळ मानवाच्या आरोग्यविषयक समस्यांबाबत निराकरण आणि येणारी आव्हाने या संदर्भात संशोधन करण्यासाठी बंगळुरू येथील इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसिन यांच्या पुढाकाराने हे काम हाती घेण्यात आले आहे. या संदर्भात इस्रो आणि हवाई दलाच्या मेडिकल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या असून, प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात झाली.अंतराळ क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकण्यासाठी भारताकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत. अंतराळात मानव पाठविण्याचा पंतप्रधान यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. २०२२ पर्यंत अंतराळात भारतीय मानवाला पाठविण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.अंतराळात मानवी जीवरक्षक प्रणालीवर भरभारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्रो) लवकरच मानवी मोहीम आखली जाणार आहे. भारतीय भूमिवरून भारतीय बनावटीच्या यानाने अंतराळवीर अवकाशात पाठविला जाणार आहे. यात अंतराळात मानवी जीवरक्षक प्रणालीवर भर देण्यात येणार आहे. इन्स्टिट्यूटआॅफ एरोस्पेस मेडिसिन या संस्थेकडे यासाठी अत्याधुनिक यंत्रणा असल्याने इस्रोकडून संस्थेची निवड केली आहे.

टॅग्स :isroइस्रोindian air forceभारतीय हवाई दल