शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

एअर एशियाचे पुणे -दिल्ली विमान रद्द,  प्रवाशांची गैरसोय; विमानतळावर गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 22:56 IST

एअर एशियाचे पुण्याहून सायंकाळी ६ वाजता दिल्लीला जाणारे विमान तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आले़

पुणे : एअर एशियाचे पुण्याहून सायंकाळी ६ वाजता दिल्लीला जाणारे विमान तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आले़ पण त्याची कोणतीही माहिती प्रवाशांना उशिरापर्यंत न दिल्यामुळे सुमारे १५० प्रवासी रात्री उशिरापर्यंत लोहगाव विमानतळावर खोळंबून राहिले होते़ दुसरीकडे त्यांना एअर एशियाच्या अधिका-याकडून कोणतीही माहिती दिली जात नव्हती किंवा काहीही सोय न केल्याने त्यातील अनेक प्रवाशांना त्रास सहन करावा लागला़ 

एअर एशियाचे पुण्याहून ६ वाजता निघणारे विमान रात्री ८़१५ वाजता दिल्लीत पोहचणे अपेक्षित होते़ सर्व प्रवासी त्याप्रमाणे वेळेत लोहगाव विमानतळावर पोहचले़ परंतु, तांत्रिक कारणामुळे हे विमान रद्द करण्यात आले़ या विमानातून १७९ प्रवासी दिल्लीला जाणार होते़ परंतु, त्यांची कोणतीही सोय एअर एशियाने केली नाही की, त्यांना उशिरापर्यंत विमान रद्द झाल्याची माहिती दिली नाही़ जेव्हा काही प्रवाशांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली तेव्हा त्यातील काही जणांना ज्या विमानात जागा शिल्लक होती़ तेथे त्यांची सोय केली़ तरीही रात्री अकरा वाजेपर्यंत शंभरहून अधिक प्रवासी विमानतळावर तटकळत बसले होते़ त्यांची काय सोय करणार याची कोणीही माहिती देण्यास तयार नव्हते़ 

 एअर एशियाच्या मॅनेजरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु,  त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही़ एअर एशियाच्या कस्टमर सर्व्हिस नंबरवर संपर्क साधला़ परंतु, त्यावर विमान रद्द झाल्याची कोणतीही माहिती दिली जात नव्हती़ हे विमान सायंकाळी ६ वाजता निघून रात्री ८़१५ मिनिटांनी दिल्लीला पोहचेल, अशी टेप रात्री साडेदहा वाजता ऐकविली जात होती़ त्यांचे सर्व एक्झीक्युटिर बिझी असल्याचे सांगितले जात होते़