शहरं
Join us  
Trending Stories
1
२४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, दुबार मतदारावरही उचललं पाऊल
2
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
3
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
4
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
5
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
6
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
7
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
8
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
10
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
11
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
12
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
13
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
14
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
15
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
16
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
17
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
18
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
19
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
20
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर

स्वावलंबनातून ‘ती’ची जगण्याची अन् शिक्षणाची धडपड, एड्स पॉझिटिव्ह युवती, शेतमजुरी करून उदरनिर्वाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 02:57 IST

‘ती’ लहान असतानाच आई-वडील सोडून गेले. आजी-आजोबांनी मायेची पाखर दिली. अगदी सातवीपर्यंत तिने कधी शाळेतील पहिला नंबर सोडला नाही अन् अचानक एक दिवशी बातमी आली, की ती एड्स पॉझिटिव्ह आहे.

- हणमंत पाटीलपिंपरी : ‘ती’ लहान असतानाच आई-वडील सोडून गेले. आजी-आजोबांनी मायेची पाखर दिली. अगदी सातवीपर्यंत तिने कधी शाळेतील पहिला नंबर सोडला नाही अन् अचानक एक दिवशी बातमी आली, की ती एड्स पॉझिटिव्ह आहे. या बातमीने ती पूर्णपणे खचली. आता आजी-आजोबाही थकले असल्याने शेतमजुरी करून जगण्याबरोबरच उच्च शिक्षणासाठी तिची धडपड सुरू आहे.पुण्यातील खेड तालुक्यातील एका गावच्या १७ वर्षांच्या तरुणीची ही हलाखीची परिस्थिती आहे. एड्स पॉझिटिव्ह असलेल्या आई-वडिलांना दोन मुली; एक मुलगी निगेटिव्ह असल्याने ती लग्न होऊन सुखाचा संसार करीत आहे. मात्र, ‘ती’ लहान असतानाच आई-वडील एड्सच्या आजाराने मरण पावले. साहजिकच आजी-आजोबांनी तिचा सांभाळ केला. लहानपणापासून ‘ती’ची तब्येत धट्टीकट्टी होती अन् आजही आहे. त्यामुळे कोणालाही तिच्या आजाराविषयी शंका नव्हती.प्राथमिक शिक्षण घेत असताना पहिला क्रमांक कधी सोडला नाही. गुणवंत विद्यार्थिनी म्हणून सर्व शिक्षकांकडून ‘ती’चे नेहमी कौतुक व्हायचे. त्यामुळे तिच्याशी मैत्री करण्यासाठी अनेक विद्यार्थिनी प्रयत्न करायच्या. शेतीवर अवलंबून असलेल्या आजी-आजोबा व मामाच्या कुटुंबाचीही हलाखीची परिस्थिती होती. मात्र, ‘ती’च्या शैक्षणिक प्रगतीमुळे सर्व मंडळी खूश होते. मात्र, तो दिवस उजाडला.सातवीत असताना तिचा खोकल्याचा त्रास वाढला. आजोबांनी तिला दवाखान्यात तपासणीसाठी नेले अन् ती पॉझिटिव्ह असल्याचे समजल्यानंतर आजोबांच्या पायाखालची वाळू सरकली. पण स्वत:ला सावरत त्यांनी तिला ही गोष्ट हळुवारपणे सांगितली अन् यापुढे तब्येतीची काळजी घेण्याविषयीचा सल्ला दिला. ‘सीआरटी’च्या गोळ्या सुरू करण्यात आल्यानंतर आपल्याला एड्स हा आजार झाल्याचे समजल्यावर तिलाही धक्का बसला. काहीही चूक नसताना ‘ती’ला यातना भोगाव्या लागणार आहेत. त्यामुळे ‘ती’च्या मनाची घुसमट व घालमेल सुरू झाली. त्याचा परिणाम शैक्षणिक प्रगतीवर होऊ लागला.कसेबसे दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. तरीही दहावीला ७५ टक्के मार्क्स मिळाले. मात्र, आता आजी-आजोबा थकून गेल्याने पुढील शिक्षणासाठी आर्थिक परिस्थिती नाही. त्यामुळे शेतमजुरी करून तिची शिक्षणाची धडपड सुरू आहे. पिंपरी-चिंचवडमधील एका महाविद्यालयात तिने बहिस्थ: विद्यार्थी म्हणून कला शाखेत प्रवेश घेतला आहे. दुर्धर आजार अन् उच्च शिक्षणाची दुर्दम्य इच्छा या संकटात ती सापडली आहे. उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘ती’ला आज सहानुभूती अन् मदतीची आवश्यकता आहे.यश फाउंडेशनचा आधारएक वर्षापूर्वी यश फाउंडेशनचे संचालक रवी पाटील, राजू आहेर व सामाजिक कार्यकर्त्या मनीषा परदेशी यांनी ‘ती’चे समुपदेशन करून शिक्षणासाठी प्रोत्साहन व आधार दिला आहे. सध्या फाउंडेशनमध्ये शिवणकामाचे प्रशिक्षण घेऊन ‘ती’ स्वावलंबनातून पुढील शिक्षण घेण्यासाठी धडपडत आहे. उच्च शिक्षण घेऊन यापुढे एड्स पॉझिटिव्ह मुलांसाठी काम करणार असल्याचे ‘ती’ने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.यश फाउंडेशनने महिंद्रा कंपनीच्या मदतीने चाकण परिसरात ‘एचआयव्ही’विषयी जनजागृतीचा कार्यक्रम सुरू केला आहे. पॉझिटिव्ह मुलांचे पुनर्वसन, जोडप्यांना स्वावलंबनासाठी प्रशिक्षण, सकस आहार, समुपदेशन देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. - रवी पाटील, संचालक, यश फाउंडेशन 

टॅग्स :Womenमहिला