शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नगरमध्ये आम्ही विखेंना हरवलंय, ती जागा राष्ट्रवादीच लढवणारः शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 15:30 IST

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या पत्रकार परिषद घेत संभाव्य निवडणुकीच्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

पुणे : अहमदनगर मतदारसंघात यापूर्वी दिवंगत बाळासाहेब विखे यांचा पराभव आम्ही एकदा केलेला आहे हा दाखला देत हा मतदारसंघ कॉंग्रेसला सोडण्यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुन्हा नकार दिला. या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद असून, आम्हीच लढणार असल्याचे ते म्हणाले.सुजय विखे भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्यासाठी राष्ट्रवादी अहमदनगरची जागा सोडणार का? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता पवार म्हणाले, ही जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात आहे. या लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैैकी दोन आमदार राष्ट्रवादीचे आहेत. उर्वरित मतदारसंघात राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर आहे. या लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसचा एकही आमदार नाही. मतदारसंघात आमची ताकद असल्याने विखे यांच्यासाठी जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही.लोकप्रियता व निवडून येण्याची क्षमता या कारणांमुळे सुजय विखे यांच्यासाठी जागा सोडली जाईल का? या प्रश्नावर ते म्हणाले, यापूर्वी विखे घराण्यातील बाळासाहेब विखे यांना आम्ही या मतदासंघातून पराभूत केलेले आहे. हा इतिहास सर्वांना माहित आहे. त्यावेळी विखे यांनी माझ्याविरोधात खटलाही भरला होता. मी निवडणुकीतून अपात्र होईल, अशी वेळ माझ्यावर आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयात मला दिलासा मिळाला. त्यामुळे विखे यांना कुणी पराभूत करू शकत नाही, असे नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Sharad Pawarशरद पवारAhmednagarअहमदनगर