शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अहो आश्चर्यम!... पालिका घेणार ८८ लाखांची ‘बोलकी’ झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : एकीकडे महावितरणची थकलेली बिले भरण्यास महापालिकेकडे पैसे नाहीत. दुसरीकडे पालिका चक्क ८८ लाख रुपये ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : एकीकडे महावितरणची थकलेली बिले भरण्यास महापालिकेकडे पैसे नाहीत. दुसरीकडे पालिका चक्क ८८ लाख रुपये खर्चून ‘बोलणारी’ झाडे खरेदी करणार आहे. एवढी मोठी रक्कम खर्च करुन होणाऱ्या ‘तीन’ झाडांच्या खरेदीत पालिकेला एक झाड २९ लाख ३३ हजार रुपयांना पडणार आहे. पालिकेच्या विद्युत विभागाकडून हा घाट घातला जात असून, त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे.

पालिकेला महत्त्वाकांक्षी समान पाणीपुरवठा योजनेसाठी २०० कोटींचे कर्ज काढावे लागत आहे. पालिकेची अनेक बिले थकलेली आहेत. अशा परिस्थितीत पालिकेकडूनही उधळपट्टी कोणाच्या ‘दबावा’खाली केली जात आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

कोरोनाकाळात पालिकेचे उत्पन्नाचे स्रोत घटले आहेत. केवळ मिळकतकराच्या उत्पन्नावर पालिकेचा डोलारा उभा आहे. पालिकेला जेमतेम साडेचार हजार कोटींचे उत्पन्न मिळणार आहे. पालिकेला मार्चअखेरीस विकासकामांची जवळपास पाचशे ते सहाशे कोटींची बिले द्यावी लागणार आहेत. पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने विकासकामे थांबवत आवश्‍यक बाबींसाठीच खर्च करण्याचे आदेश आयुक्‍तांनी दिले होते. हा आदेश काही दिवसच पाळला गेला. मात्र, पुन्हा उधळपट्टी सुरू झाली आहे.

चौकट

गेल्या काही दिवसांत विद्युत विभाग या ना त्या कारणावरून चर्चेत आहे. विद्युत विभागाकडे पालिकेच्या इमारती, कार्यालये तसेच इतर आस्थापनांची वीजबिल भरण्याची जबाबदारी आहे. निधी संपल्याने वारंवार अन्य प्रकल्पांचा निधी वर्गीकरणाद्वारे घेऊन गाडा हाकला जात आहे. या स्थितीत असतानाही विद्युत विभागाकडून मात्र बोलणाऱ्या झाडांवर अनावश्‍यक उधळपट्टी सुरू आहे.

चौकट

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या प्रभाग १२ क मधील बाळासाहेब ठाकरे उद्यानात ८८ लाख रुपयांची ही तीन झाडे असणार आहेत. या झाडांना इलेक्‍ट्रॉनिक डिवाइस बसविण्यात येणार असून, नागरिक झाडाजवळ गेल्यानंतर ही झाडे त्यांच्याशी संवाद साधणार असल्याचे सांगण्यात आले. पर्यावरण तसेच वृक्षसंवर्धनाची माहिती ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरुपात देण्याची संकल्पना यामागे आहे.