शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

कृषी स्टार्टअपला सहकाराचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 05:33 IST

शेती व्यवसायातील ‘स्टार्ट अप’ उद्योगांना महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या माध्यमातून तब्बल ५ कोटी रुपयांपर्यंत कर्जपुरवठा करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे.

- विशाल शिर्के पुणे : शेती व्यवसायातील ‘स्टार्ट अप’ उद्योगांना महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या माध्यमातून तब्बल ५ कोटी रुपयांपर्यंत कर्जपुरवठा करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. काही प्रकल्पात महामंडळामार्फत गुंतवणूक देखील केली जाणार आहे.महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित ही सरकारने स्थापन केलेली कंपनी २००० साली अस्तित्वात आली. सहकाराला बळ देण्याचे उद्दिष्ट त्यामागे होते. मात्र, गेल्या १७ वर्षांपासून या कंपनीचे कामकाज बंद होते. सहकार मंत्रालयाने या संस्थेचे पुनरुज्जीवन केले असून, त्या अंतर्गत रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचा (आरबीआय) नॉन बँकींग फायनान्स कंपनीचा परवाना मिळविला आहे. या कंपनीच्या माध्यमातून कृषी व्यवसाय आणि सहकारी संस्थांना वित्तपुरवठा, कृषी व्यवसाय व सहकारासाठी सल्लागार आणि कृषी व्यवसाय आणि सहकारी संस्थांचा कौशल्य विकास करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. राज्य सरकार, आशियाई विकास बँक, जागतिक बँकेकडून निधीची उभारणी करण्याचे काम केले जाईल.सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी नुकताच या उपक्रमाच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यात कृषी आणि सहकार विभागातील स्टार्ट अप्स उद्योगांना पाठिंबा देण्यासाठी ‘व्हेंचर कॅपिटल फंडा’ची स्थापना करण्याचे ठरविण्यात आले. जमा झालेल्या निधीत ५१% भर सरकार घालेल, असे स्वरूप आहे.>उपक्रम आणि उद्दिष्टेशेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे आणि ग्रामीण भागात रोजगार निर्माण करणे, तसेच जलसमृद्धी योजनेमध्ये नोडल एजन्सी म्हणून महामंडळ काम पाहणार आहे.सहकारी संस्थांची उत्पादने एका छताखाली आणून ब्रँड तयार करणेकृषी आणि सहकार क्षेत्रातील कौशल्य वाढीसाठी १ लाख व्यक्तींचे प्रशिक्षण करणे