शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र साहित्य परिषद-पंजाब साहित्य अकादमीत सामंजस्य करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 15:39 IST

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि पंजाबी साहित्य अकादमी लुधियाना (पंजाब) यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. यापुढील काळात साहित्याचे आदान-प्रदान करण्याच्या उद्देशाने एक पाऊल आणखी पुढे टाकण्यात आले आहे.

ठळक मुद्देमसाप ही १११ वर्षांची परंपरा असलेली साहित्यातील मातृसंस्था पंजाबी साहित्य अकादमीला ६३ वर्षांची वाडमयीन परंपरा आहे.

पुणे : घुमानमध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने पंजाब आणि महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक धागा विणला गेला. यापुढील काळात मराठी-पंजाबी भाषा भगिनींचा स्नेह अधिक दृढ होण्याबरोबरच साहित्याचे आदान-प्रदान करण्याच्या उद्देशाने एक पाऊल आणखी पुढे टाकण्यात आले आहे. त्यादृष्टीने  महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि पंजाबी साहित्य अकादमी लुधियाना (पंजाब) यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. या करारामुळे भाषिक सौहार्दाबरोबरच उत्तम साहित्य कृतींचे अनुवाद, दोन्ही भाषांतील लेखकांचा संवाद, पुस्तक प्रदर्शने, संशोधन, साहित्य संमेलन आणि कार्यशाळा याना चालना मिळणार असल्याची  माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. या सामंजस्य करारावर पंजाबी साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. सुखदेव सिंग सिरसा, सचिव डॉ. सुरजित सिंग, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, सरहदचे संजय नहार, पहिल्या विश्वपंजाबी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सुरजित पातर यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. मसाप आणि पंजाबी साहित्य अकादमी या दोन संस्थांमधल्या या सामंजस्य करारात सरहद पुणे समन्वयकाची भूमिका बजावणार आहे. मसाप ही १११ वर्षांची प्रदीर्घ परंपरा असलेली साहित्यातील मातृसंस्था आहे तर पंजाबी साहित्य अकादमीला ६३ वर्षांची वाडमयीन परंपरा आहे. 'वेगळ्या राज्यातील दोन साहित्यविषयक काम करण्यार्‍या आणि समृद्ध परंपरा असणार्‍या महत्वाच्या साहित्य संस्थांनी सामंजस्य करार करण्याची ही इतिहासातील पहिलीच घटना आहे. या करारामुळे या दोन भाषांमध्ये भाषिक सौहार्द तर निर्माण होईलच त्याचबरोबर उत्तम मराठी साहित्यकृतींचा पंजाबीत आणि पंजाबी साहित्यकृतींचा मराठी अनुवाद व्हावा यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे. दोन्ही भाषांतील लेखकांना संवादासाठीचे एक हक्काचे व्यासपीठ यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे. दोन्ही राज्यात दोन्ही भाषांतील पुस्तकांची प्रदर्शने भरविण्यात येणार आहेत. शासनाच्या पातळीवर दोन्ही भाषांच्या अभिवृद्धीसाठी संयुक्तपणे प्रयत्न केले जाणार आहेत. संशोधनाबरोबर, संमेलन आणि कार्यशाळांचे आयोजन करण्याबरोबर प्रतिवर्षी दोन्ही भाषेतील सर्वोत्कृष्ट साहित्यकृतींना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मराठीतील अभिजात साहित्यकृती पंजाबी साहित्य अकादमीच्या ग्रंथालयात तर पंजाबीतील उत्तम साहित्यकृती मसापच्या ग्रंथालयात उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे जोशी यांनी सांगितले. 

टॅग्स :literatureसाहित्यMaharashtraमहाराष्ट्र