शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात सत्ताधारी पक्षाच्याच नगरसेविकेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 03:32 IST

बोपोडी येथील भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक ८ मधील नगरसेविका अर्चना मुसळे यांनी सोमवारी साडेचार वाजता आयुक्त सौरभ राव यांच्या कार्यालयासमोर प्रभागातील अनेक नागरिकांना घेऊन आंदोलन केले. विकासकामात घरे बाधित होणाऱ्यांचे पुनर्वसन करताना प्रशासन त्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

पुणे : बोपोडी येथील भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक ८ मधील नगरसेविका अर्चना मुसळे यांनी सोमवारी साडेचार वाजता आयुक्त सौरभ राव यांच्या कार्यालयासमोर प्रभागातील अनेक नागरिकांना घेऊन आंदोलन केले. विकासकामात घरे बाधित होणाऱ्यांचे पुनर्वसन करताना प्रशासन त्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप त्यांनी केला. अतिरिक्त आयुक्त शीतल उगले-तेली यांनी त्यांना यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.बोपोडी येथे हॅरिस पुलानजीक रस्तारुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यात तेथील सुमारे २३३ घरे बाधित होत आहेत. त्यांना देण्यासाठी याच परिसरात महापालिकेच्या मालकीच्या १६६ सदनिका आहेत, वेगवेगळ्या योजनांखाली त्या पालिकेकडे आल्या आहेत. तिथे प्राधान्याने या सर्वांचे पुनर्वसन करणे शक्य असताना प्रशासन मात्र या बाधितांना हडपसर व बाहेरच्या परिसरात पाठवत आहे.न्यायालयाचा आदेश, आयुक्तांचा आदेश डावलून क्षेत्रीय कार्यालयाने सर्व बाधितांच्या हडपसर येथील घरांसाठी सोडती काढल्या, असे नगरसेविका अर्चना मुसळे यांनी सांगितले. सर्वाचे व्यवसाय, नोकरी बोपोडीत असताना त्यांच्यावर हडपसर येथे जाण्यासाठी सक्ती करण्यात येत आहे, त्याविरोधात आंदोलन करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्यासमवेत हे सर्व नागरिकही उपस्थित होते.अतिरिक्त आयुक्त शीतल तेली-उगले यांनी आंदोलनाची माहिती मिळताच त्यांनी मुसळे यांना बोलावणे पाठवले. त्या वेळी हे सर्व नागरिक तसेच क्षेत्रीय अधिकारी संदीप कदम, मालमत्ता व्यवस्थापन अधिकारी अनिल मुसळे आदी उपस्थित होते. मुसळे यांनी त्यांना सर्व स्थिती सांगितले. तेली-उगले यांनी त्यांना यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले व कोणत्याही बाधितावर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊन असे स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाBJPभाजपाnewsबातम्या