शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला मालिकावीरचा पुरस्कार
4
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
5
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
6
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
7
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
8
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
9
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
10
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
11
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
12
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
13
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
14
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
15
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
16
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
17
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
18
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
19
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
20
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'

वृद्धत्व नव्हे कार्यातील उत्साह महत्वाचा : डॉ.रघुनाथ माशेलकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 17:01 IST

वृध्दत्व आल्यानंतर आरोग्यविषयक तक्रारी जाणवू लागतात. मात्र, आपल्या कार्यातील उत्साह जपल्यास त्या वेदनांवर मात करणे शक्य होते.

ठळक मुद्दे ज्येष्ठांच्या भव्य आनंद मेळाव्याचे उद्घाटन एक लाख रुपयांचा आरोग्य विमा ज्येष्ठ नागरिकांचा असून त्याचा लाभ घेता येणार६० रुग्णालयांमध्ये रक्ताच्या सर्व प्रकारच्या चाचण्या ज्येष्ठ नागरिकांना मोफतवृध्दांकरिता वेगवेगळे उपक्रम व्हावेत यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील

पुणे :  तंत्रज्ञानाचा झपाट्याने विकास होत असताना त्यामुळे होणारे बदल अवाक करणारे आहेत. आरोग्याच्या क्षेत्रात देखील त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होताना पाहावयास मिळतो. वृध्दत्व आल्यानंतर आरोग्यविषयक तक्रारी जाणवू लागतात. मात्र, आपल्या कार्यातील उत्साह जपल्यास त्या वेदनांवर मात करणे शक्य होते. त्यामुळे वृध्द झाले तरी उत्साह महत्वाचा असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले. जनसेवा फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय विभाग, महानगरपालिका, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, अस्कॉप याबरोबरच ज्येष्ठ नागरिकांकरिता काम करणा-या इतर विविध संघटनांच्यावतीने ज्येष्ठांच्या आनंद मेळाव्यांचे उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गणेश कला क्रीडा मंच येथे झालेल्या या सोहळयाला डॉ.के.एच.संचेती, आमदार मोहन जोशी, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ.सिध्दार्थ धेंडे, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, अंकुश काकडे, माजी मंत्री मदन बाफना, ज्येष्ठ उद्योजक बहारी बी.आर.मल्होत्रा, जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विनोद शहा आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी सामाजिक व दानशुर कार्यकर्ते नानजीभाई शहा यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. वयाची शंभरी ओलांडलेल्या गऊबाई भिकोबा निवंगुणे (वय  १०८), इंदुबाई कृष्णा नलावडे (वय १०५), लक्ष्मण गणेश दिनकर (वय १०६), शालिनी चिरपुटकर (वय  १०२), विमलानंद पंडित (वय १०० ), अ‍ॅड. बी. जे. खताळपाटील (वय १०० ), नलिनी कुलकर्णी (वय १०० ),  मथुरा रघुनाथ फरगडे (वय १०० ) या ज्येष्ठांना शतायुषी पुरस्काराबरोबरच ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे, ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे, शरदचंद्र पाटणक र, वसंत थिटे दांम्पत्य यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  डॉ. माशेलकर म्हणाले, आपल्याकडील शिक्षण ज्ञानवर्धित स्वरुपाचे आहे. त्याला भविष्यात मुल्यवर्धित करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. मुल्यवर्धित शिक्षणाची बीजे मुलांमध्ये रुजल्यास त्यांची वृध्दांप्रती आदर व सन्मानाची भावना वाढण्यास मदत होईल. वृध्दत्व आनंदमयी करण्याकरिता उत्साह टिकवणे गरजेचे आहे. हे सांगताना माशेलकर यांनी स्वत: ७५ वर्षाचा असून देखील सतत कार्यरत असल्याचे उदाहरण दिले. अखंड उर्जा व इच्छाशक्ती असल्यास चिरंजीवी आयुष्य जगता येईल. असेही ते म्हणाले. उपमहापौर धेंडे यांनी ज्येष्ठ नागरिकांकरिता आरोग्याच्या विविध योजनांची माहिती दिली. ते म्हणाले, एक लाख रुपयांचा आरोग्य विमा ज्येष्ठ नागरिकांचा असून खासगी रुग्णालयात देखील त्याचा त्यांना लाभ घेता येणार आहे. तसेच शहरातील वेगवेगळ्या ६० रुग्णालयांमध्ये रक्ताच्या सर्व प्रकारच्या चाचण्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत करता येणार आहेत.  मानपत्राचे वाचन शर्वरी शुक्ला सुत्रसंचालन विवेक कुलकर्णी यांनी केले. मीना शहा यांनी आभार मानले. 

* वृध्दमैत्री शहर व्हावे यासाठी राहणार प्रयत्नशीलआनंदी ज्येष्ठात्वाकरिता पुढील काळात शहरात वृध्दमैत्री शहर ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. तसेच वृध्दांकरिता वेगवेगळे उपक्रम व्हावेत यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील राहणार आहे. बसमध्ये, स्वच्छतागृहांमध्ये वृध्दांकरिता विशेष व्यवस्था करुन देणार असून नाना नानी पार्कच्या माध्यमातून त्यांना विरंगुळा केंद्राची निर्मिती केली जाईल. असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेMukta Tilakमुक्ता टिळकPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका