शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय मागे?

By admin | Updated: May 30, 2017 02:49 IST

पवना धरणात मुबलक पाणी असतानाही टँकर लॉबीच्या फायद्यासाठी पाणीटंचाईचा आरोप केल्यानंतर विरोधकांनी केल्यानंतर

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पवना धरणात मुबलक पाणी असतानाही टँकर लॉबीच्या फायद्यासाठी पाणीटंचाईचा आरोप केल्यानंतर विरोधकांनी केल्यानंतर पाणी कपात मागे घेण्याची उपरती सत्ताधाऱ्यांना आली आहे. कपातीसंदर्भात मंगळवारी महापौरांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार आहे. पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ कारभाराचाही पंचनामा महापौर करणार आहे. पवना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे. दोन मेपासून ही कपात सुरू आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पाणीकपात मागे घेतली आणि पाऊस वेळेवर पडला नाही, तर नियोजन कोसळेल. त्यामुळे पाणीकपात मागे घेणार नाही, दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे महापौर नितीन काळजे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. पवना धरणातील साठा ३० टक्क्यांवर आल्यानंतर महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. सध्या धरणातील २८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. परंतु, अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. चिखली, मोशी, चऱ्होली या समाविष्ट गावांत टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले असून पुरवठा विस्कळीत झाला आहे. याबाबत महापौरांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावर महापौरांनी टँकरवर चालक उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. आता जर पाणी कपात मागे घेतली आणि पावसाने ओढ दिली, तर पाण्याचे भीषण संकट ओढावू शकते. त्यामुळे कपात करण्याचा निर्णय घेतला. पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळपणाचा तोटा नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यांचा समाचार घ्यावा लागणार आहे. पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाणी कपात मागे घेण्याविषयी निर्णय घेण्यात येणार आहे. - नितीन काळजे, महापौर दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, मनसेच्या नगरसेवकांना टँकर लॉबीसाठी टंचाई केली जात असल्याचा आरोप केला होता. खासदार श्रीरंग बारणे, शहरप्रमुख राहुल कलाटे, माजी गटनेत्या सुलभा उबाळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम यांनी पाणीटंचाई विरोधात आक्रमक भूमिका घेतली.