घोटवडे गावठाण, कुंभार, गुंडगळवाडी केसवड पडाळ, शेळकेवाडी या भागासाठी असलेले रोहित्र (ट्रान्सफाॅर्मर) दोन वर्षे नादुरुस्त असल्याने या परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत होता. त्यामुळे नागरिकांची गैरसोय व्हायची त्यामुळे माजी सरपंच पल्लवी भेगडे यांनी वीज वितरण कंपनी मुळशी कार्यालयात संपर्क करून सातत्याने पाठपुरावा करून रोहित्र मिळविले. यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मुळशीचे अभियंता फड, उपअभियंता वावरे यांनी रोहित्र देण्यास विशेष सहकार्य केले. यावेळी रूपेश भेगडे, संदीप कुंभार, सिकंदर कुंभार, संतोष कुंभार, कुंदन कुंभार, गणेश केसवड, अनिल गुंडगळ, संतोष कुंभार, गनेश गुंड, गळ यांनी शुभम ढिले, गोरक्ष घायतळे, मालपोटे यांनी रोहित्र बसविण्यासाठी विशेष परिश्रम घेतले असल्याची माहिती रूपेश भेगडे यांनी दिली.
--