शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

पावसानंतर विठुरायाच्या भेटीची आस

By admin | Updated: June 27, 2015 23:55 IST

बेभरवशाच्या निसर्गाने या वर्षी कृपा केली अन् आभाळाच्या ओंझळीतून पावसाचे भरभरून दान दिले आहे. त्यामुळे सर्वत्र पेरणीच्या कामांची लगबग सुरू झाली असून, शेतकरी आनंदित आहेत.

पिंपरी : बेभरवशाच्या निसर्गाने या वर्षी कृपा केली अन् आभाळाच्या ओंझळीतून पावसाचे भरभरून दान दिले आहे. त्यामुळे सर्वत्र पेरणीच्या कामांची लगबग सुरू झाली असून, शेतकरी आनंदित आहेत. विठुरायाची झालेली कृपा म्हणून पेरणीनंतर निश्चिंत झाल्यावर लाखो शेतकऱ्यांनी पंढरीला जाण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी आषाढी वारीमध्ये वारकऱ्यांची संख्या ३० टक्क्यांहून अधिकने वाढणार असल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. मात्र, या वर्षी पुणे परिसरासह सर्वत्रच अपेक्षेपेक्षा चांगला पाऊस झाला आहे. मावळ तालुक्यात आताच जून महिन्याच्या पावसाची सरासरी ओलांडली गेली आहे. येथे ४०० मि.मी.पेक्षाही अधिक पाऊस झाला आहे. पुणे परिसरातही २०० ते २५० मि.मी. पाऊस बरसला आहे. इतकेच नाही, तर हा पाऊस सर्वत्र पडला आहे. परिणामी, या सर्वच गावांमध्ये जमिनीमध्ये पुरेसा ओलावा झाला आहे. यातून शेतकरी समाधानी झाले असून, २० टक्के शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली आहे. भातरोपांची चांगली उगवण झाली असून, जोमात वाढही होत आहे. बाकीच्या शेतकऱ्यांचीही कडधान्ये, गळीत धान्यांच्या पेरणीची लगबग सुरू आहे. काही शेतकऱ्यांना शेतामध्ये पेरणीयोग्य वाफसा होण्याची प्रतीक्षा आहे. वाफसा होताच पेरणी करून या वर्षी वारीत हमखास जाणार असल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)-देहू येथून प्रस्थान ठेवणाऱ्या संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्यात व आळंदी येथून निघणाऱ्या संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये राज्यातील व राज्याबाहेरील अनेक पालख्या सामील होतात. येथून सर्व पालख्यांचे पंढरीकडे प्रस्थान होते. आषाढी वारी करणाऱ्यांमध्ये शेतकरी वर्गाचे प्रमाण सर्वाधिक असते. मात्र, मागील वर्षी पावसाने बराच काळ दडी मारली होती. शेतांमधील ढेकळंही फुटली नव्हती. परिणामी, पेरणी शक्य नसल्याने दुसरा आधार नसणाऱ्या शेतकऱ्यांना वारीला जाणे शक्य झाले नव्हते. -पालख्या पंढरपूरजवळ पोहोचेपर्यंतही बहुतांश भागात पेरणीयोग्य पाऊस झाला नव्हता. पालखी सोहळा पंढरपुरात दाखल होण्याच्या सुमारासच पुणे, पिंपरी -चिंचवडसह संपूर्ण राज्यात दमदार पाऊस झाला होता. झालेल्या पावसानंतर पेरणी व शेतीची सर्व कामे उरकून अनेक शेतकरी अखेरच्या टप्प्यात पालखी सोहळ्यामध्ये सामील झाले होते. काही जणांनी वाहनांमधून थेट पंढरपुरात पोहोचून विठुरायाचे दर्शन घेत वारी चुकविली नाही. पण, त्यामुळे पायी चालणाऱ्या वारकऱ्यांचे प्रमाण मागील वर्षी तुलनेने कमी राहिले होते. मागील वर्षी पाऊसच झाला नव्हता. आज पेरणी होईल, उद्या पेरणी होईल, याची वाट पाहण्याची वेळ आल्याने अनेक जणांना सुरुवातीपासून वारीत सहभागी होता आले नव्हते. मात्र, या वर्षी पांडुरंगाची कृपा झाली अन् सगळीकडे चांगला पाऊस झाला आहे. गावागावांतील शेतकरी कामे उरकून घेत आहेत. वारीपर्यंत सर्व कामे मार्गी लावून पांडुरंगाच्या भेटीची आस घेऊन मोठ्या प्रमाणात शेतकरी या वर्षी येतील.- हभप विकासमहाराज गिरवले, गिरवली, ता. जुन्नर, पुणेदर वर्षी नित्यनेमाने वारी करणारे कधीही वारी चुकवत नाही. अनेक जण शेतीची कामे उरकल्यावर वारीत सहभागी होतात. मागील वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे पायी वारी करणाऱ्यांचे प्रमाण कमी होते. पण, या वेळी चांगला पाऊस झाला आहे. त्यातच अधिक महिना आल्याने अशा स्थितीत पेरण्या उरकून वारीमध्ये जादा वारकरी सहभागी होतील, असा आजवरचा अनुभव आहे. - हभप प्रीतममहाराज मोरे, देहू