शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

क्रांतिकारकांच्या त्यागाची स्मारके स्वातंत्र्यानंतरही दुर्र्लक्षित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 03:27 IST

पुणे : स्वातंत्र्याच्या वेदीवर जीवाची पर्वा न करता क्रांतिकारकांनी बलिदान केले खरे. परंतु स्वातंत्र्याचा आनंद उपभोगताना त्या त्यागाचे विस्मरण होत असून त्यांची स्मारके दुर्लक्षित राहत असल्याचे वास्तव समोर येत आहे. आज९ आॅगस्ट रोजी क्रांतिदान साजरा होत असताना ‘लोकमत’ केलेल्या पाहणीत समोर आलेली ही वस्तुस्थिती.प्रवीण जगताप तळेगाव ढमढेरे : येथील हुतात्मा विष्णू ...

पुणे : स्वातंत्र्याच्या वेदीवर जीवाची पर्वा न करता क्रांतिकारकांनी बलिदान केले खरे. परंतु स्वातंत्र्याचा आनंद उपभोगताना त्या त्यागाचे विस्मरण होत असून त्यांची स्मारके दुर्लक्षित राहत असल्याचे वास्तव समोर येत आहे. आज९ आॅगस्ट रोजी क्रांतिदान साजरा होत असताना ‘लोकमत’ केलेल्या पाहणीत समोर आलेली ही वस्तुस्थिती.प्रवीण जगताप तळेगाव ढमढेरे : येथील हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या राष्ट्रीय स्मारकाची आवाराची दुरवस्था पाहायला मिळते. स्मारक सुशोभीकरण व स्मारक परिसरातील इतर कामांसाठी सुमारे ३२ लाखांचा निधी खर्चूनही आज देखभाल व्यवस्थेसाठी स्वतंत्र यंत्रणा नसल्याने ही दुरवस्था असल्याचे जाणकारांनी सांगितले. शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे या गावातील हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे हे एक महान क्रांतिकारक होते.त्यांच्या त्यागाला सलाम करावा, म्हणून १९८२ मध्ये तळेगाव ढमढेरे येथे ग्रामपंचायतीसमोर शासनाने हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचे स्मारक बांधले.सन २००९ मध्ये १० लाख, तर २०१४-१५मध्ये २२ लाख रुपये खासदार प्रकाश जावडेकर यांच्या निधीतून या स्मारकाच्या सुशोभीकरण व स्मारक परिसरातील इतर कामांसाठी मिळाले. कामेही झाली; परंतु या स्मारकाच्या देखभालीसाठी कुठलीच स्वतंत्र व्यवस्था नसल्याने अलीकडच्या काळात दुरवस्था झालेली आहे.तारेच्या कुंपणानजीक कचºयाचा ढिगारा पडलेला आहे. परिसर बºयाचदा अंधारमय असतो. स्मारक परिसराभोवती तिन्ही बाजूंनी भक्कम स्वरूपात संरक्षक भिंती बांधल्या गेल्या; मात्र एका बाजूने तारेचे व जाळीचे कुंपण आहे. हे जाळीचे कुंपण तोडून पायवाट केल्याचे दिसून येते.स्मारकाच्या देखभालीसाठी ग्रामपंचायतीकडे कुठलाही स्वतंत्र निधी उपलब्ध होत नाही. विशेष निधी उपलब्ध झाल्यास स्मारक आवारात विविध सुविधा उपलब्ध करता येईल.- गोविंद ढमढेरे, सदस्य, ग्रा.पं. तळेगाव ढमढेरेसध्या स्मारक आवाराला तिन्ही बाजूंनी भक्कम स्वरूपात संरक्षक भिंती आहेत; परंतु एका बाजूने तार व जाळीचे कुंपण असल्याने ते कुंपण तोडून रस्ता केल्यामुळे उर्वरित एका बाजूलाही भक्कम स्वरूपाची संरक्षक भिंत बांधण्यात यावी.- भीमराव ढमढेरे, ज्येष्ठ नागरिक, तळेगाव ढमढेरेयेथे राष्ट्रीय स्मारक आहे. देखभाल करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्याने ते दुर्लक्षित राहिले आहे. मृत्युंजय फाईट क्लबच्या माध्यमातून आम्ही पूर्ण स्मारक परिसर देखभाल करण्यासाठी २०१४-१५च्या दरम्यान ग्रामपंचायतीकडे परवानगी मागितली होती; परंतु ती नाकारण्यात आली.- प्रमोद फुलसुंदर,संस्थापक-अध्यक्ष, मृत्युंजय फाईट क्लब इंडियाहोन्या भागोजी केंगले यांचे स्मारक उपेक्षितसंतोष जाधव तळेघर : थोर आदिवासी क्रांतिकारक होन्या भागोजी केंगले यांचे स्मारक त्यांच्या जन्मभूमीत म्हणजे जांभोरीमध्ये व्हावे, अशी इच्छा तमाम आदिवासी बांधवांची असताना शासनाने हे स्मारक दुर्लक्षितच ठेवले आहे. या स्मारकासाठी हेमंत काळू केंगले व मारुती धोंडू केंगले व माजी उपआयुक्त लक्ष्मण डामसे यांनी पुढाकार घेऊन २००२ मध्ये कर्ज काढून जांभोरी येथे छोटेसे स्मारक उभारले आहे. शासनाने यामध्ये दुरुस्ती करून भव्य स्मारक उभारावे, अशी मागणी होन्या केंगले स्मारक समितीचे अध्यक्ष हेमंत केंगले यांनी केली आहे. १८७५-७६मध्ये क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या समकालीन असणारा आंबेगाव तालुक्यातील जांभोरी येथील होन्या भागोजी केंगले हा क्रांतिकारक होता. होन्या केंगले यांचे नाव बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाºया श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील बसस्थानकाला देण्यात यावे; घोडेगाव येथील पंचायत समितीत उभारण्यात आलेल्या स्मृतिस्तंभावर कोरण्यात यावे, यासाठी आदिवासी संघटनांकडून पत्रव्यवहार करण्यात आला आहे अशी माहिती आदिवासी संघटनेचे शशिकांत करवंदे, सरपंच संजय दामोदर केंगले व आदिवासी समाज कृती समितीचे अध्यक्ष सीताराम जोशी यांनी दिली.