शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चार पिढ्यानंतर आलं दारात पाणी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2019 20:54 IST

पुण्यापासून साधारण ८० किलोमीटर अंतरावरील वेल्हे तालुक्यातील पोळे या दुर्गम भागामधील धनगरांची वस्ती असलेले गाव आहे.

ठळक मुद्देवेल्हा तालुक्यातील दुर्गभ भागात पाण्यासाठी व्हायची पायपीट 

पुणे : ''चार पिढ्यानंतर आता आमच्या दारात पाणी आलंय, नाय तर त्या डोंगराहून पाणी आणावं लागायचं बाबा ! आमी कसं बी पालापाचोळा खाऊ पण पाण्याचं काय करणार बा ! उन्हा-तान्हाचं आम्हाला किती तरी मैल पाण्यासाठी हिडावं लागायचं. पण आता दारात पाणी पाहून लय आनंद व्हतंय बाबा !'' या भावना आहेत सुलाबाई ढेबे यांच्या. 

पुण्यापासून साधारण ८० किलोमीटर अंतरावरील वेल्हे तालुक्यातील पोळे या दुर्गम भागामधील धनगरांची वस्ती असलेले गाव आहे. धनगर समाजातील अनेक घरे इथे आहेत. गेल्या अनेक वषार्पासून हे लोक या ठिकाणी ते राहत आहेत. गेले अनेक वर्षे पाण्यासाठी रोज दोन ते तीन किलोमीटर अंतर डोंगरात पायपीट करून धनगर लोक घरात पाणी आणतात. तसेच पाणी नाही म्हणून नाईलाजाने  तरूण वर्गास वस्ती सोडून शहराकडे कामाचा शोधात जावे लागत आहे.  पाण्याच्या अभावी दुभती जनावरेही दूध देईनाशी झाली. इथे एका उंच डोंगराळ भागात एक जीवंत  झरे असलेले मोठे टाके आहे. या भागातून  डोंगरात  जाऊन  पाणी आणायचे म्हणजे खूप जिकिरीचे काम आहे. ही सर्व स्थिती टेलस  आॅर्गनायझेशन संस्थेचे लोकेश बापट व जान्हवी  बापट यांनी पाहिली. तेथे प्रत्यक्ष जाऊन या लोकांच्या घरापर्यंत पाणी कसे आणता येईल, ते पाहिले.  टेलस ऑर्गनायझेशन व देवराई फाऊंडेशनचे धनंजय शेडबाळे यांच्या एकत्रितपणे येथे पाईप लाईन व पाण्याच्या टाक्या सुलाबाई रामचंद्र ढेबे,  रामभाऊ ढेबे यांच्या घराच्या अंगणात पाण्याची व्यवस्था करून दिली. 

वेल्हा तालुक्यात काही कामानिमित्त मी माझ्या गाडीने जात होतो. तेव्हा एका आजीबाई मला रस्त्यातून चालताना दिसल्या. त्या दळण करण्यासाठी पायपीट करत होत्या. त्यानंतर त्यांच्याशी बोलल्यावर त्यांच्या अनेक समस्या उलगडल्या. त्यात पाण्याची समस्या गंभीर असल्याचे समोर आले. डोंगरावरून पाणी आणावे लागत असल्याचे पाहिले. त्यामुळे त्यांच्यासाठी २६०० फूटांची पाइपलाइन टाकून त्यांच्या दारात पाणी आणले. - लोकेश बापट, टेल्स ऑर्गनायझेशन संस्था 

गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही डोंगरावरील टाकवेतून पाणी आणतोय. तिथं जीवंत झरा असल्याने बारामाही पाणी असते. त्यामुळे आमच्या जगण्यासाठी ते टाकवे हेच आवश्यक बनले आहे. कारण इतर कुठेही पाणी नाही. परंतु, आता पाइपलाइन झाल्याने आम्हाला डोंगरावर जाऊन पाणी आणावे लागणार नाही. - रामभाऊ ढेबे, ग्रामस्थ, पोळे गाव 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीdroughtदुष्काळ