शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अखेर पाच दिवसांनंतर पूर्व भागाला पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 01:21 IST

मुक्ता टिळक : लष्कर पाणीपुरवठा जलकेंद्राला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा

पुणे : मुठा उजवा कालवा फुटीनंतर विस्कळीत झालेला शहराच्या पूर्व भागाचा पाणीपुरवठा तब्बल ५ दिवसांनंतर सुरळीत होणार आहे. खडकवासला धरणातून कॅनॉलमध्ये १५० क्युसेक्सने लष्कर पाणीपुरवठा जलकेंद्राला पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे मंगळवारपासून (दि. २) पूर्व भागाचा पाणीपुरवठा सुरळीत सुरु होईल, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विविध स्वरूपाच्या विद्युत दुरुस्तीसाठी गुरुवारी (दि. २७) संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्याच दिवशी सकाळी सव्वा अकरा वाजता मुठा उजवा कालवा फुटला. यामुळे लष्कर जलकेंद्राला कॅनॉलद्वारे होणार पाणीपुरवठा बंद करण्यात आला. यामुळे गेल्या पाच दिवसांपासून शहराच्या पूर्व भागाचा पाणीपुरवठा जवळजवळ बंदच होता. याबाबत महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले की, कालवा फुटीमुळे लष्कर जलकेंद्राच्या हद्दीत पाणीपुरवठा बंद झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींना तोड द्यावे लागेल. परंतु कालव्याची तातपुरती दुरुस्ती करून लष्कर जलकेंद्राला पाणी मिळेल यासाठी तात्पुरत्या स्वरूपात बंधारा बांधण्यात आला आहे. सध्या १५० क्युसेक्सने कालव्यात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे मंगळवारपासून नेहमीप्रमाणे लष्कर जलकेंद्रातून ३५० एमएलडीने पाणीपुरवठा सुरू होणार असल्याचे मुक्ता टिळक यांनी स्पष्ट केले.सध्या महापालिका प्रशासनाकडून येथील नागरिकांची शाळांमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी पाण्याच्या लाईन दुरुस्त करण्यात येत आहेत. स्वच्छतागृह अणि विद्युत विभागाकडुन प्रकाश व्यवस्था करण्यात येत आहे. नागरिकांकडुन करण्यात आलेल्या तक्रारींची दखल घेवून काम करण्यात येत आहे. येथील नागरिकांची संपुर्ण मदत करण्यात येणार असल्याचेटिळक यांनीसांगितले.कालवा फुटीत ९८ झोपड्या पूर्णपणे उद्ध्वस्तकालवा फुटल्यानंतर अनेक घरांमध्ये पाणी शिरले. याचा पंचनामा आता महापालिका आणि जलसंपदा विभागाकडून पूर्ण करण्यात आला आहे. झोपड्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे ९८ झोपड्या पूर्णपणे वाहून गेल्या आहेत. या नागरिकांनी पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे महापौर टिळक यांनी सांगितले. यापुढे अतिक्रमण रोखण्यासाठीसुद्धा प्रयत्न केले जाणार आहेत.

टॅग्स :PuneपुणेMukta Tilakमुक्ता टिळक