शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या आश्वासनानंतर मराठा क्रांती मोर्चाचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 23:38 IST

निवेदन दिले : आंदोलकांचे अटकसत्र त्वरित थांबविण्याची मागणी

चाकण : महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान दाखल करण्यात आलेल्या निरपराध तरुणांवरील गुन्हे विनाशर्त मागे घेण्यात यावेत या मागणीसाठी जाहीर केलेले आमरण उपोषण पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले.

कोरेगाव भीमा दंगलीच्या धर्तीवर समिती स्थापन करावी व इतर काही मागण्यांचे निवेदन चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना देण्यात आले. त्यानंतर उपोषण स्थगितीचा निर्णय घेण्यात आला. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर, मनोहर वाडेकर, माजी आमदार दिलीप मोहिते, अशोक मांडेकर, कालिदास वाडेकर, जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे, भगवान मेदनकर, बाबा राक्षे, अंकुश राक्षे, शंकर राक्षे, प्रीतम परदेशी, राहुल नायकवाडी, गणेश पºहाड, अतिष मांजरे, नीलेश पानसरे, बाबाजी कौटकर, गणेश मांडेकर, विजय खाडे, रत्नेश वैरागे यांच्या शिष्टमंडळाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना निवेदन दिले. निवेदनात मराठा आंदोलकांचे अटकसत्र त्वरित थांबविण्यात यावे. तसेच शासन, मराठा समन्वयक व पत्रकार यांची समिती स्थापन करण्यात यावी असे म्हटले आहे.दंगलीमध्ये ज्यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे अशा लोकांना ताब्यात घ्या, मात्र ज्यांचा या आंदोलनात काही सहभाग नाही, त्यांना तपासाकरिता ताब्यात घेऊन गंभीर गुन्हे दाखल करीत आहेत. ही कारवाई करताना त्यांच्या नातेवाइकांना किंवा मराठा समन्वय समितीला विश्वासात घेत नाही त्यामुळे समाजात अकारण तेढ निर्माण होत आहे. संबंधित व्यक्तींना सीसीटीव्ही फुटेज दाखवावे, असे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोहर वाडेकर यांनी या वेळी सांगितले.निवेदन स्वीकारल्यानंतर चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार म्हणाले की, समिती स्थापन करण्याचा सर्वस्वी निर्णय हा वरिष्ठ अधिकारी घेतील. तपासामध्ये अडथळे निर्माण होऊ नये म्हणून सीसीटीव्ही फुटेज दाखवता येणार नाही; मात्र तुमच्या मागण्यांचे निवेदन हे वरिष्ठ कार्यालयात पाठवूनदेणार आहे.शहराला छावणीचे स्वरूपउपोषण आंदोलनानिमित्त मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. परिणामी पोलिसांना निवेदन देताना चाकण परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे चाकण शहराला छावणीचे स्वरूप आले होते.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड