शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ७ वर्षांनंंतर शिक्षणसेवक म्हणून रुजू

By admin | Updated: April 25, 2017 03:56 IST

पुणे जिल्ह्यातील २६ डी. एड. विद्यार्थ्यांना प्रशासनाने तब्बल ७ वर्षांच्या संघर्षानंतर शिक्षणसेवक म्हणून पुणे महानगरपालिकेमध्ये रुजू केले.

केडगाव : पुणे जिल्ह्यातील २६ डी. एड. विद्यार्थ्यांना प्रशासनाने तब्बल ७ वर्षांच्या संघर्षानंतर शिक्षणसेवक म्हणून पुणे महानगरपालिकेमध्ये रुजू केले.महाराष्ट्रात २०१० मध्ये सी. ई. टी. परीक्षा झाली. या परीक्षेमध्ये अनेक यशस्वी विद्यार्थी शिक्षणसेवक म्हणून रुजू झाले. या सी. ई. टी. च्या लेखी परीक्षेमध्ये काही ५ लेखी प्रश्न चुकले होते. यामुळे थोडक्यात मेरिटमध्ये न बसणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी याविरोधात पेपर पुन्हा तपासावे, म्हणून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. प्रश्न चुकल्यामुळे या याचिकेचा निकाल २०१४ मध्ये विद्यार्थ्यांच्या बाजूने लागला. याचा फायदा महाराष्ट्रातील तब्बल ३५०० विद्यार्थ्यांना झाला. त्यानंतर संबंधित विद्यार्थी आपापल्या जिल्ह्णात शिक्षणसेवक म्हणून रुजू झाले. परंतु पुणे जिल्ह्णातील ९० विद्यार्थ्यांना रोस्टरचे काम अपूर्ण दाखवून प्रशासनाने शिक्षणसेवक म्हणून रुजू करून घेतले नाही. याविरोधात संबंधित विद्यार्थ्यांनी आंदोलन, उपोषण व चर्चा आदी मार्ग अवलंबले.२०१५ मध्ये संबंधित विद्यार्थ्यांनी आयुक्त कार्यालयासमोर ५ दिवसांचे उपोषण केले. अखेर पुणे येथील प्रशासनाला जाग आली. सर्व तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर गेल्या आठवड्यामध्ये ९० पैकी २६ विद्यार्थी पुणे महानगरपालिकेमध्ये रुजू झाले. याबाबत शिक्षणसेवक कलीम तांबोळी म्हणाले, की सुमारे ७ वर्षांच्या संघर्षांनंतर आम्हाला नोकरी मिळाली.