शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅप्लिकेशन हॅक करून चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 06:18 IST

अ‍ॅप्लिकेशनची बॅकअप सिस्टीम हॅक करून त्यामधील दहा हजार रुपयांच्या व्हाउचर्सची चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला सायबर क्राईम सेलने कर्नाटक येथून अटक केली.

पुणे : एका सॉफ्टवेअर कंपनीने चित्रपटासंबंधीचा टेÑलर दाखविण्यासाठीच्या अ‍ॅप्लिकेशनची बॅकअप सिस्टीम हॅक करून त्यामधील दहा हजार रुपयांच्या व्हाउचर्सची चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला सायबर क्राईम सेलने कर्नाटक येथून अटक केली.राहुल पी. हरिहरन (वय २२, रा. वनश्री हॉस्टेल, सिरसी, जि. कारवार, कर्नाटक) असे अटक केलेल्याचे नाव आहे. वैभव भार्गव (वय ३६, रा. बाणेर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पोडियम सिस्टीम प्रा. लि. नावाची सॉफ्टवेअर कंपनीने चित्रपट संबंधीचे टेÑलर दाखविण्यासाठी ‘रिव्ह्यू देदे’ या नावाचे अ‍ॅप्लिकेशन तयार केले होते. हे अ‍ॅप जास्तीत जास्त लोकांनी डाऊनलोड करून वापरण्यासाठी फिर्यादी यांनी ग्राहकांसाठी आॅफर व बक्षिसे ठेवली होती. हे अ‍ॅप आरोपीने डाऊनलोड करून फिर्यादीच्या परवानगीशिवाय स्वत:च्या आर्थिक फायद्याकरिता ‘रिव्ह्यू देदे’ या अ‍ॅप्लिकेशनची बॅकअप सिस्टीम हॅक करून त्यामधील पीव्हीआर सिनेमाचे ६७, कार्निव्हल सिनेमाचे २६ व शॉपर्स स्टॉपचे १३० व्हाउचर असे एकूण २२३ व्हाउचर्स चोरी केले.यापैकी पीव्हीआरचे एकूण ९००० रुपयांचे ३० व्हाउचर्स आणि शॉपर्स स्टॉपचे १५०० रुपयांचे ५ व्हाउचर्स असे सर्व मिळून एकूण १० हजार ५०० रुपयांची आर्थिक फसवणूक आरोपीने केली. तसेच सिस्टीम हॅक कशी करायची, अशा स्वरूपाचे एसएमएस पाठविण्यात आल्याने त्याच्यावर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.सायबर सेलच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक राधिका फडके, पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस उपनिरीक्षक सोनाली फटांगरे, पोलीस हवालदार अस्लम अत्तर, दीपक भोसले, संतोष जाधव, राहुल हंडाळ आणि शाहरूख शेख यांनी ही कामगिरी केली.या गुन्ह्याचा समांतर तपास सायबर सेलने केला. त्यामध्ये आरोपी हा कर्नाटक सिरसी येथे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सेलने सिलसी येथे जाऊन आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. तपासात आरोपीने ‘रिव्ह्यू देदे’ हे अँड्रॉईड अ‍ॅप स्वत:च्या मोबाईलमध्ये डाऊनलोड व इन्स्टॉल करून घेतले. त्यानंतर थर्ड पार्टी व्हर्नेबिलिटी सॉफ्टवेअरच्या मदतीने त्या अ‍ॅपच्या त्रुटी शोधल्या. यात अँड्रॉईड अ‍ॅपमध्ये डाटा इंस्क्रिप्शनमध्ये कोणतीच काळजी घेतली नसल्याची त्रुटी आढळली. या त्रुटीचा गैरफायदा आरोपीने घेत अ‍ॅपच्या युजरचा सर्व डाटा व गिफ्ट व्हाऊचर स्वत:कडे वळवून घेतल्याचे उघड झाले.