शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

राजगुरुनगर न्यायालयाबाहेर वकिलांचे आंदोलन

By admin | Updated: April 25, 2017 03:53 IST

वकिलांच्या विरोधी असणारे विधेयक बिल कायद्यात दुरुस्ती व्हावी, यासाठी राजगुरुनगर येथे वकिलांच्या वतीने न्यायालय आवाराबाहेर या बिलाची होळी केली.

दावडी : वकिलांच्या विरोधी असणारे विधेयक बिल कायद्यात दुरुस्ती व्हावी, यासाठी राजगुरुनगर येथे वकिलांच्या वतीने न्यायालय आवाराबाहेर या बिलाची होळी केली.प्रस्तावित वकील कायदा दुरुस्ती विधेयक २०१७ खेड बार असोसिएशनच्या वतीने निषेध करून वकीलविरोधी बिल रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार बी. बी. बोडके यांना देण्यात आले. लॉ कमिशन आफ इंडियाने हे विधेयक पारित केले आहे. त्यावर अंतिम मंजुरी होणार असून हे बिल वकीलविरोधी आहे. वकिलांचा अधिकार व हक्कांवर यामुळे गदा येणार आहे. त्यामुळे वकिलांना प्रामाणिकपणे व पारदर्शीपणे काम करता येणार नाही. या विधेयक बिलात असलेल्या जाचक त्रुटींमुळे वकील न्यायालय व पक्षकार संघर्ष वाढणार आहे. त्यामुळे खेड बार असोसिएशनच्या वतीने या आंदोलनात सामील होऊन या बिलाचा निषेध करीत आहे, असे खेड बारचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल राक्षे यांनी सांगितले. दरम्यान, राजगुरुनगर न्यायालयासमोर या बिलाची होळी करण्यात आली. नायब तहसीलदार बोडके यांना खेड बार असोसिएशनच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी अ‍ॅड. अनिल राक्षे, उपाध्याक्ष अ‍ॅड. आश्विनी पानसरे, सचिव अ‍ॅड. संजय गोपाळे, अ‍ॅड. गणेश गाडे, अ‍ॅड. पोपटराव तांबे, अ‍ॅड. बी. एम. सांडभोर, अ‍ॅड. अर्चना किर्लोस्कर, अ‍ॅड. सुलभा कोटबागी, अ‍ॅड. स्वाती आचार्य, पूनम पाटोळे, स्वाती थिगळे, स्मिता शिंदे उपस्थित होते.(वार्ताहर)